देशीदारूची वाहतूक करणारे वाहन पकडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

भंडारा : स्थानिक गुन्हे शाखेने अड्याळ येथून दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये देशीदारूची तस्करी करणाऱ्या वाहनासह दारूसाठा जप्त केला आहे.

भंडारा : स्थानिक गुन्हे शाखेने अड्याळ येथून दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये देशीदारूची तस्करी करणाऱ्या वाहनासह दारूसाठा जप्त केला आहे.
अड्याळ येथून चारचाकी वाहनातून दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांत दारूची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवादविरोधी सेलचे पथक कारवाईसाठी रवाना केले. अड्याळ येथील बाजार वॉर्डातील देशी दारूच्या दुकानातून दारू रवाना होताना पथकाने छापा टाकला. यात मालवाहू वाहन, एक दुचाकी आणि देशी दारूच्या 85 पेट्या असा एकूण 12 लाख 41 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. यात देवानंद लक्ष्मण मेश्राम (रा, प्रदानबोरी, जि. यवतमाळ) आणि सुदेश गजानन बनकर (रा. चंद्रपूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक फौजदार मेहर तपास करीत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Country wine transport vehicle caught