नांदगावखंडेश्वर तालुक्‍यात दाम्पत्याची आत्महत्या

file photo
file photo

अमरावती : नांदगावखंडेश्वर तालुक्‍यात शुक्रवारी (ता. 16) पतीने स्वत:च्या घरात गळफास घेऊन तर पतीच्या आत्महत्येचे वृत्त कळताच माहेरीच पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली.
मयूर रमेश मरगळे (वय 24, रा. येणस) व पूनम मयूर मरगळे (वय 21), असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक नरेश पारवे यांनी दिली.
मयूरने स्वत:च्या गावी शिवणी रसुलापूर येथे गळफास घेतला; तर पत्नी पूनम हिने माहेरी येणस गावात विष घेतले. पतीचा घरातच मृत्यू झाला, तर पत्नीचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. 16) सकाळी शेतात फवारणी असल्यामुळे मोठा भाऊ चंद्रशेखर याने मयूरला शेतात सोबत चालण्याबाबत म्हटले होते. मात्र त्याने प्रकृती ठीक नसल्याचे कारण सांगून तो घरीच थांबला. सकाळी साडेनऊच्या सुमारास चंद्रशेखर काम आटोपल्यावर घरी पोहोचला असता त्याला लहान भाऊ मयूर गळफास घेतलेल्या स्थितीत लटकलेला दिसला. त्याने घटनेची माहिती नांदगावखंडेश्वर पोलिसांना दिली. मयूरने गुरुवारी (ता. 15) रक्षाबंधन असल्यामुळे पत्नी पूनमला येणस येथे माहेरी नेऊन सोडले होते. चंद्रशेखर याने माहेरी गेलेल्या मयूरच्या पत्नीला मयूरने आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्याचा मनावर परिणाम झाल्यामुळे पूनमने माहेरीच विष घेतले. तिला उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला.
मयूरचे रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. त्याला दारूचेही व्यसन होते. शेतात जाण्यासाठीही त्याने शुक्रवारी (ता. 16) नकार दिला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
- नरेश पारवे,
पोलिस निरीक्षक, नांदगावखंडेश्वर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com