प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

महेन्द जुन्नाके
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

खरांगणा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मदना येथे प्रेमीयुगुलानी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.

वर्धा : खरांगणा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मदना येथे प्रेमीयुगुलानी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.

गावातील छगन उर्फ बंटी प्रल्हाद गिरी (वय 24) रजनी दिलीप तुमडाम तुला (वय 21) हे 19 फेब्रुवारीला मध्यरात्री घरून निघून गेले. त्यानंतर त्यांचे मृतदेह सकाळी युवराज पुनवटकर यांचे शेतातील विहिरीत आढळून आले. त्यामुळे गावात विविध चर्चांना उधाण आले. मृत तरुणीचे बाहेरगावी लग्न ठरले होते, साखरपुडाही झाला होता. तरीही दोघांमध्ये प्रेमाच्या आणाभाका झाल्यामुळे कदाचित एका ठिकाणी येऊ शकत नाही. याला घरच्यांचा विरोध होईल, या विवंचनेतून या युगुलानी आत्महत्येचा मार्ग निवडला अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, सदर घटनेची माहिती करना पोलिसांना देण्यात आली आहे. ठाणेदार संतोष शेगावकर, जमादार कामडी, जमादार बावणे, शिपाई मनीष मसराम घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती मनोज पुनवटकर यांनी गावचे पोलिस पाटील अमित धोपटे यांना दिली. कराना पोलिसांना दिली. विहिरीतून दोन्ही मृतदेह बाहेर काढले असून, शवविच्छेदन करण्यासाठी वर्धा येथे हलविण्यात आले.

Web Title: A Couple Committed Suicide jump in the well