डॉ. देवपुजारी यांची मुलगी-जावयाचा कॅलिफोर्नियातील बोट फायरमध्ये मृत्यू

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

नागपूर - उपराजधानीतील नामांकित डॉक्‍टर सतीश देवपुजारी यांची मुलगी आणि जावयाचा एका बोटमध्ये झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी कॅलिफोर्नियात घडली. संजिरी निर्मळ आणि कौस्तुभ निर्मळ असे मृत पावलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कौस्तुभ निर्मळ हे कॅलिफोर्नियातील एक फायनान्स कंपनीत कार्यरत होते. तर संजिरी या दंतचिकित्सक होत्या. कौस्तुभ हे पत्नी संजिरीसह गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत राहत होते. सोमवारी सकाळी निर्मळ दाम्पत्य कॅलिफोर्नियातील लॉस एंजलिस, आईसलॅंड येथील बोटमध्ये बसले होते. 

या बोटमध्ये निर्मळ दाम्पत्यासह ३४ प्रवासी होते. अचानक बोटला आग लागली आणि स्फोट झाला. यामध्ये निर्मळ दाम्पत्यासह ३४ जणांचा मृत्यू झाला. कोस्ट गार्ड पोलिसांनी मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू केले आहे. मृतदेहाचे मेडिकल-डीएनए टेस्ट केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Couple Death in Boat Blast Fire