आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नागपूर  : काटोल येथील खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. प्रेमचंद चंद्रभान चरडे (65) असे आरोपीचे नाव आहे. 30 एप्रिल 2016 रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला खुनाच्या आरोपात जन्मठेप व 6 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, कलम 307 अंतर्गत सात वर्षे कारावास व 6 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास नऊ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत आरोपीचे अपील फेटाळत सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

नागपूर  : काटोल येथील खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. प्रेमचंद चंद्रभान चरडे (65) असे आरोपीचे नाव आहे. 30 एप्रिल 2016 रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला खुनाच्या आरोपात जन्मठेप व 6 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, कलम 307 अंतर्गत सात वर्षे कारावास व 6 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास नऊ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत आरोपीचे अपील फेटाळत सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. मृताचे नाव नंदकिशोर कोरडे होते. कोरडेचे वडील व आरोपीमध्ये दुकान खरेदीवरून वाद झाला होता. 26 सप्टेंबर 2013 रोजी आरोपीने कोरडेसह इतर तिघांना चाकूने भोसकले. त्यात कोरडेचा मृत्यू झाला आणि इतर तिघे गंभीर जखमी झाले होते. न्यायालयात सरकारतर्फे ऍड. एस. डी. सिरपूरकर यांनी कामकाज पाहिले. न्यायमूर्ती प्रदीप देशमुख आणि न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: court news in kotal