वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

मूल (जि. चंद्रपूर) : दबा धरून बसलेल्या वाघाने गायीच्या कळपावर हल्ला केला. त्या कळपाला वाचविताना गुराखी जखमी झाल्याची घटना तालुक्‍यातील काटवन येथील कम्पार्टमेंट नंबर 762 मध्ये शनिवारी (ता. 12) दुपारी घडली. सुखदेव नानाजी कुळमेथे (वय 37, रा . काटवन) असे जखमी गुराख्याचे नाव आहे.

वनव्याप्त काटवन परिसरात वाघांचा संचार आहे. या भागात गुराख्याने गायी चरायला नेल्या होत्या. मात्र, या ठिकाणी कळप पाहून वाघ दबा धरून बसला होता. ही बाब गुराख्याच्या लक्षात आली नाही. अचानक झालेल्या हल्ल्यात कळप बिथरला. यात गुराखी जखमी झाला. आरडाओरड केल्याने वाघाने जंगलात धूम ठोकली. जखमी गुराख्याला प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले. येथील वनपरिक्षेत्राधिकारी बोबडे आणि भाजपचे शहराध्यक्ष प्रभाकर भोयर यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. भोयर यांच्या वाहनाने जखमीला चंद्रपूर येथे भरती करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cowboy injured in tiger attack