शिक्षणाधिकाऱ्यांच्या ऑफिसला "फटाके'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

अमरावती : शहराच्या बाहेर फटाक्‍याच्या गोदामाशेजारीच शाळा सुरू असून त्यामुळे चिमुकल्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या शाळेबाबत शिक्षणाधिकारी कार्यालय कुठलीच कार्यवाही करीत नसल्याचे पाहून युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता.24) शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात फटाके आंदोलन केले.

या नामांकित शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच फटाक्‍यांचे मोठे गोदाम आहे. अनेक वर्षांपासून हे गोदाम असून शाळेतील चिमुकल्यांसाठी ही बाब धोकादायक असल्याचा आरोप युवासेनेचे राहुल माटोडे यांनी केला. विशेष म्हणजे शाळा सुरू करतेवेळी शासनाने घालून दिलेल्या नियम व अटी शर्तींचे पालन करणे गरजेचे असताना संबंधित शाळा व्यवस्थापनाकडून चिमुकल्यांच्या जीविताचा कुठलाही विचार करण्यात आला नाही, असा आरोप माटोडे यांनी केला. धोकादायक ठिकाणी सुरू असलेली ही शाळा त्वरित स्थानांतरित करण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता.24) थेट माध्यमिक शिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांच्या दालनात फटाके नेले. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना ही शाळा स्थानांतरित करण्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच फटाके फोडू, असा इशारासुद्धा दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Crackers' to education officer's office