"सीआरसी'त ना संगणक ना इंटरनेट

मंगेश गोमासे
रविवार, 14 जुलै 2019

नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि सारक्षता विभागातर्फे देशभरातील शाळांद्वारे 30 प्रपत्रातील माहिती "यू-डाईज प्लस' (युनिफाईड डिस्ट्रिक्‍ट इन्फॉर्मेशन ऑन स्कूल एज्युकेशन) पोर्टलवर भरण्यात आली. ही माहिती तपासण्याची जबाबदारी समूहसाधन केंद्रांकडे (सीआरसी) दिली आहे. मात्र, एकीकडे डिजिटलायझेशनच्या बोंबा मारत असताना समूहसाधन केंद्रात इंटरनेट सोडाच, साधे संगणक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे शाळांनी नोंदविलेली माहिती तपासायची कशी? हा प्रश्‍न केंद्रप्रमुखांना पडला आहे.

राज्यात यू-डाईजवर ऑनलाइन माहिती भरण्यास 25 एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली. त्यासाठी जिल्हा, तालुका व केंद्रपातळीवर (सीआरसी) कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण देण्यात आले. यानुसार यू-डाईजमध्ये शाळेच्या भौतिक सुविधा, विद्यार्थी संख्या, शिक्षकांची माहिती, मिळालेले आर्थिक अनुदान, वाचनालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण, शाळा व्यवस्थापन समिती, निकालाची माहिती, अपंग विद्यार्थ्यांची माहिती (सीडब्ल्यूएसएन), शाळेचे अक्षांश, रेखांश, मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक, ई-मेल इत्यादी माहिती भरायची होती. मिळालेली माहिती केंद्रप्रमुखांना व्हेरिफिकेशन केल्यानंतर ऑनलाइन "सर्टिफाईड' करून घ्यायची आहे.
राज्यात 1 लाख 10 हजार 189 शाळा आहेत. जवळपास सर्वच शाळांकडून माहिती भरण्यात आल्याचे समजते. दिलेली माहिती खरोखर योग्य आहे किंवा नाही याची तपासणी 10 ते 70 शाळांचा समावेश असलेल्या समूह साधन केंद्रात केंद्रप्रमुखांमार्फत करायची आहे. मात्र, राज्यात 4 हजार 860 केंद्रप्रमुखांपैकी केवळ 2 हजारांवर पदे भरली आहेत. भरलेल्या केंद्रप्रमुखांवर बरीच अतिरिक्त कामे लादली आहेत. दुसरीकडे समूह साधन केंद्रावर कालबाह्य झालेले संगणक आहेत. बऱ्याच ठिकाणी तेसुद्धा नाहीत. शिवाय संकेतस्थळावर जाण्यासाठी इंटरनेटची सेवा नसल्याने तपासणी करायची कशी, हा प्रश्‍न निर्माण होतोय.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CRC does not have computer and Internet