लाभार्थ्यांची यादी तयार करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

अर्जुनी मोरगाव - राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ ची माहिती वापरून प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांच्या प्राधान्यक्रम याद्या तयार करण्याचे परिपत्रक ग्रामविकास व जलसंधारण विभागाने १ ऑगस्ट रोजी दिले आहे. त्यानुसार तालुक्‍यात आवास योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या १३ एप्रिल २०१६ च्या पत्रातील सूचनेनुसार ग्रामपंचायत व संवर्गनिहाय प्राधान्यक्रम यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीतील संपूर्ण कुटुंबाची घर निकषाबाबतची तालुकास्तरीय समितीने तत्काळ तपासणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल अभिप्रायासह १५ दिवसांत जिल्हास्तरीय समितीकडे पाठवायचा आहे. संकेतस्थळावर उपलब्ध असलेली संवर्गनिहाय उपलब्ध प्राधान्यक्रम यादी ग्रामसभा आयोजित करण्याच्या तारखेपूर्वी ८ दिवस ग्रामपंचायतच्या सूचनाफलकावर लावावी, असे निर्देश दिले.

ग्रामसभा १५ ऑगस्ट रोजी किंवा त्यादरम्यान आयोजित करावयाची आहे. क्षेत्रीयस्तरावरून गटविकास अधिकारी, पं. स. प्रतिनिधींनी उपस्थित राहून ग्रामसभेसाठी मार्गदर्शन व साहाय्य करावयाचे आहे. ग्रामसभेपुढे ठेवण्यात येणारे विषय दर्शविण्यात आले आहेत. ग्रामसभेच्या ठरावाद्वारे मंजूर झालेल्या याद्यांना ग्रामसभा झालेल्या तारखेपासून ७ दिवस प्रसिद्धी द्यावयाची आहे. यात बदल, वगळणे आदी हरकती असल्यास यादी प्रसिद्धीची मुदत संपल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येईल. यासाठी तालुका व जिल्हास्तर अपील समिती गठित करण्यात आली आहे. तालुकास्तरीय समितीत अध्यक्ष गटविकास अधिकारी, सदस्य सचिव विस्तार अधिकारी सांख्यिकी, सदस्य नायब तहसीलदार व शाखा अभियंता यांचा समावेश आहे. यासाठी कामकाज सुरू झाल्याची माहिती गटविकास अधिकारी एन. आर. जमईवार यांनी दिली.

Web Title: Create a list of beneficiaries