भांडेवाडीत होलसेल मासोळी बाजार बांधावा 

file photo
file photo

नागपूर : भांडेवाडीत होलसेल दरातील मासोळी बाजार बांधावा, अशा मागणीचा मध्यस्थी अर्ज अजय घारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केला होता. हा अर्ज उच्च न्यायालयाने मंजूर केला. 
सामाजिक कार्यकर्ते रोहित गौर यांनी मेयो रुग्णालयापुढील भोईपुरा येथील मासोळी बाजार हटविण्यासाठी जनहित याचिका दाखल केली. स्ट्रीट व्हेंडर्स (प्रोटेक्‍शन ऑफ लाइव्हलीहूड ऍन्ड रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स) ऍक्‍ट-2014 मधील तरतुदींनुसार मासोळी व्यवसायासाठी परवाना बंधनकारक आहे. मासोळी विक्रेते या कायद्यातील तरतुदींचे पालन करीत नाही. भोईपुरा येथील बाजारामुळे वाहतूक कोंडी होते. परिसरात प्रदूषण निर्माण होते. मासोळ्यांच्या निरुपयोगी अवयवांची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असल्याचे याचिकाककर्त्याचे म्हणणे आहे. 
मासोळी बाजार बांधण्यासाठी काही ठोक विक्रेत्यांनी भांडेवाडी येथील जागेला पसंती दिली. तर काहींनी मंगळवारी येथील जमिनीचा आग्रह धरला असल्याने विक्रेत्यांमध्येच तीव्र वाद असल्याची माहिती महानगरपालिकेने यापूर्वी न्यायालयात दिली होती. अशातच अजय घारे यांनी भांडेवाडी येथे होलसेल मासोळी बाजार बांधावा, अशी मागणी करणारा मधस्थी अर्ज दाखल केला. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मधस्थी अर्ज मंजूर केला असून, यावर दोन आठवड्यांनंतर सुनावणी निश्‍चित केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. सेजल लखानी यांनी, मनपातर्फे ऍड. सुधीर पुराणिक कामकाज पाहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com