अखेर रस्त्याच्या कडेला जाळला मृतदेह

चांपा - स्मशानभूमीअभावी रस्त्याच्या कडेला मृतदेह जाळताना गावकरी.
चांपा - स्मशानभूमीअभावी रस्त्याच्या कडेला मृतदेह जाळताना गावकरी.

चांपा - मृत्यूनंतरही मृतात्म्याची अवहलेना होत असताना गावकरी कित्येक दिवसांपासून गावात स्मशानभूमीची मागणी करीत आहेत. परंतु, त्यांच्या मागणीकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्यामुळे गावकरी हतबल झालेले आहेत. यावर पर्याय म्हणून मृत रमेश धोडोबाजी मून (वय ६०) यांच्या निधनानंतर गावकऱ्यांनी त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला जाळून रोष व्यक्‍त केला.

चांपा येथे अनेक वर्षांपासून स्मशानभूमी नसल्यामुळे गावकऱ्यांना उघड्यावर मृतदेह जाळावा लागतो. स्मशानशेड व पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे झाडाझुडपांमध्ये लोक बसतात. उघड्यावर मृतदेह जळत असून प्रशासनाला जाग कधी येणार, आमचा प्रश्न कधी सोडवणार, असा प्रश्न करीत लोकप्रतिनिधी व प्रशासनावर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे. 

चांपा या गावांमध्ये पंधराशे लोकसंख्या असलेल्या चांपा या गावांमध्ये जिल्हा परिषद सदस्यांमार्फत स्मशानभूमी व स्मशानभूमीपासून गावापर्यंतचा रस्ता यासंदर्भात ग्रामपंचायतने वेळोवेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती येथे प्रस्ताव पाठविला. परंतु याकडे आमदार, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी पाठ फिरविली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे ‘गाव तिथे स्मशानभूमी’ ही योजना राबवली जात असून चांपा या गावांमध्ये स्मशानभूमी का नाही, असा सवाल गावकरी करीत आहेत. चांपा या गावांमध्ये अजूनपर्यंत स्मशानभूमी नाही, याबद्दल ग्रामस्थांना खंत वाटते.

येथे वेगवेगळ्या जाती-धर्मातील व  समुदायातील नागरिक वास्तव्य करीत असून याकडे प्रशासन दुर्लक्षच करीत आहे. चांपा ग्रामपंचायतमध्ये अजूनही जिल्हा परिषदेकडून कोणतेच विकासाचे कामे झालेले नाही. स्मशानभूमीची जटिल समस्या असून याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी  जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. स्मशानभूमी बांधून दिली नाही, तर नागपूर-उमरेड महामार्गावर मृतदेह जाळू असा इशारा चांपावासींनी दिला.

शासनाने लवकरात लवकर ‘गाव तिथे स्मशानभूमी’ योजनेअंतर्गत स्मशानभूमीकरिता जिल्हा परिषदने निधी मंजूर करून गावातील जटिल समस्या सोडवावी.
- अतिश पवार, नवनिर्वाचित सरपंच चांपा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com