घरकुल तर बांधले अनुदान केव्हा देणार?

large Gharkul.jpg
large Gharkul.jpg

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : घरकुल योजनेतील गरजवंत लाभार्थ्यांची अनुदानाअभावी फरफट सुरू आहे. तोकडी रक्कम घेऊन उसनवारी करून बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांचे हप्ते रखडल्याने मोठी पंचाईत झाली आहे. कागदपत्रांची पूर्तता करताना होणारे हेलपाटे वेगळेच. खात्यात हप्ता पडला का ? याची विचारणा करण्यासाठी लाभार्थी पंचायत समिती आणि बँकमध्ये दररोज चकरा मारतांना दिसत आहेत.

काही लाभार्थीचे घर बांधकाम पूर्ण झाल्यावरही पहिलाच हप्ता मिळाला. तर त्या नंतरची प्रक्रिया पंचायत समिती स्तरावरील संबंधित कर्मचारी कासव गतीने करत असल्याचा अनेक तक्रारी आहेत. परंतु आपले काम अडकेल म्हणून कुणीही तक्रार करण्यासाठी समोर येत नाही. बाहेर मात्र जिओ टॅग, पाहणी, फोटो काढणे, रोजगार हमी मस्टर काढणे, टाकणे आदी विषयावर संतापजनक चर्चा लाभार्थ्यांना ऐकावयास येतात. पंचायत समितीकडून जवळपास 450 फाईल तयार असून, निधी नसल्याने लाभार्थ्यांना हप्ते मिळत नसल्याची माहिती आहे.

पक्के घर असलेले लाभार्थी
पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून डॉ. हिरोळे कार्यरत असताना घरकुल वाटपात मोठा गोंधळ झालेला आहे. त्यामध्ये ज्याचे नावे पक्के घर आहे अशाचा लाभार्थी म्हणून समावेश असून पूर्ण रकमाही संबंधित कर्मचारी यांनी इमानदारीने काढून दिले आहेत. इतकेच नाही तर नावे जागा नसताना पाहुणे असलेल्यांना, एका ग्रामपंचायतमध्ये लाभ घेऊन दुसऱ्या ग्रामपंचायतमध्ये वास्तव्यास जाताच घरकुल मिळवणे, असे अनेक किस्से घडलेले आहेत. अर्थात यामध्ये अर्थकारण दडलेले आहेच.

बोगस घरकुल प्रकरणाची दिल्लीपर्यंत तक्रार
बोडखा गावातून घरकुल बोगस प्रकरणाबाबत दिल्ली पर्यंत तक्रार झालेली आहे. त्याची चौकशी अजून सुरूच आहे. पंचायत समिती आणि जिल्हा प्रशासन यांचेकडे ही तक्रारी आहेत. यामध्ये जे गरजू होते ते वंचित राहले. एकाच घरात जमीन आणि पक्के घर असणाऱ्यांना एक नाही दोन नाही तर तीन घरकुलचा लाभ देण्याचा प्रताप ही कसून चौकशी लागल्यास समोर आल्याशिवाय राहणार नाही. प्रपत्र ब मध्ये नाव नसताना व घरकुल बांधकाम पूर्ण नसताना पूर्ण पैसे काढले जातात. जे पैसे देत नाहीत त्यांना रोजगार हमीचे मस्टर पासून त्रास होतो. ही मानसिकता सरकारच्या योजनांना घरघर म्हणावी लागेल. 

लाभार्थ्यांना दिलासा द्यावा
ज्यांचे नावाने जागा नाही अश्या नागरिकांची प्रपत्र ब मध्ये नावेही घेतलेली नाहीत. त्यांना प्रपत्र ड मध्ये नाव देण्याच्या सल्ला दिल्या गेला. याला काय म्हणावे, असा प्रश्नही निर्माण होत आहे. ही स्थिती अशीच राहली तर मजुरी करणाऱ्या कुटुंबानी घर बांधावे तरी कसे? यासाठी राज्य सरकारने लक्ष घालून पैशाअभावी त्रस्त असलेल्या घरकुल लाभार्थींना दिलासा देण्याची गरज आहे आणि प्रत्येक पंचायत समिती मधून घरकुल संदर्भातील संपूर्ण माहितीचा आढावा घेणे गरजेचे बनले आहे.

स्वाक्षरी करतावा करावा लागतो विचार
संग्रामपूर गटविकास अधिकारी म्हणून प्रभार असलेले बी.डब्लू. चव्हाण यांना घरकुल योजनेमध्ये मोठी कसरत करावी लागत आहे. अगोदरची पार्श्वभूमी पाहता फाईलवर सही करताना विचार करावा लागत आहे. सोबतच कर्मचाऱ्यांबाबतीत होणाऱ्या तक्रारीचा बंदोबस्त करण्याचे आव्हान ही त्यांना पेलावे लागणार असे चित्र आहे.

पैसे उपलब्ध होताच लाभार्थींच्या खात्यात
अगोदर काय झाले त्याची चौकशी वरिष्ठ करतीलच, पण माझे कारकीर्दमध्ये कोणत्याही गरीब आणि गरजूवर अन्याय होणार नाही. याची खबरदारी घेण्याबाबत मी स्वतः कर्मचाऱ्यांकडून अहवाल घेत आहे. 450 फाईल तयार आहेत. फक्त शासनाकडून पैसे उपलब्ध होताच लाभार्थींचे खात्यात पैसे टाकले जातील.
-बी. डब्लू. चव्हाण, प्रभारी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, संग्रामपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com