पावसामुळे टळली दंगल; सजनपुरी भागात दोन गटात तुफान दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

मंदिरासमोर कचरा टाकण्यास मनाई केली असता दोन तरुणांमध्ये वाद झाला. या वादानंतर दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना सजनपुरी भागात आज ता २३ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. या दगडफेकीत ५  जण जखमी झाले.

खामगांव- मंदिरासमोर कचरा टाकण्यास मनाई केली असता दोन तरुणांमध्ये वाद झाला. या वादानंतर दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना सजनपुरी भागात आज ता २३ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. या दगडफेकीत ५  जण जखमी झाले.

दरम्यान, आज सजनपुरी भागामध्ये पोलीसांचा कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खामगांव शहरापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या सजनपुरी गावात रोडच्या कडेला असलेल्या हनुमान मंदिरासमोर काही महिला व नागरिक कचरा टाकण्यास आले असता तेथे कचरा टाकु नये असे काही नागरीकांनी सांगितले. या कारणावरुन वाद झाला. काही काळातच या वादाचे रुपांतर तुफान दगडफेकीत झाले. या दगडफेकीमध्ये काही दुकानांची तसेच एक टाटा मॅजीक गाडीची तोडफोड झाली असुन काही नागरिकांच्या घरावर सुध्दा दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजी नगर पोलीसांचा ताफा दाखल झाला व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. 

दगडफेकीच्या घटनेमध्ये शेख आजम याला दगड लागल्याने त्याचे दोन दात पडले. त्याला पुढील उपचारार्थ अकोला येथे रेफर करण्यात आले. तर किशोर नाईक, अमोल भास्कर गिते, शेख मुज्जफर, अनिल बेनीवाल हे पाच जखमी झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक श्याम घुगे, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाकुर हे घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या सजनपुरी गावामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असुन सजनपुरी गावामध्ये तणावपुर्ण शांतता आहे.

पावसामुळे दंगल टळली
सजनपुरी गावात शनिवारी सायंकाळी दोन गटात वाद झाला, दगडफेक सुरू असल्याची माहीती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील हे क्षणाचाही विलंब लावता ताफ्यासह दाखल झाले. त्यांनी जमाव पांगवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र लोक दगड, काठ्या घेऊन रस्त्यावर येत होते. पोलिसांना अतिरिक्त कुमक हवी होती. अश्यातच जोरदार पाऊस सुरू झाला आणि लोक घरात गेले. त्यामुळे एक प्रकारे पावसामुळे मोठी दंगल शनिवारी टळली आहे. आता गावात कडक बंदोबस्त आहे.

Web Title: cricese in two groups in Sajanpuri area