देशातील क्रिकेट बुकींचे नागपुरात बस्तान!

speculation
speculation

नागपूर - वर्ल्डकपसाठी देशभरातील मोठमोठ्या क्रिकेट बुकींनी उपराजधानीत बस्तान मांडले आहे. मुंबईनंतर नागपुरातून क्रिकेट बुकींनी लाइन टाकल्याची चर्चा आहे. मात्र, ही सर्व सट्टेबाजी पोलिसांच्या नाक्‍कावर टिचून उपराजधानीत सुरू असल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.

क्रिकेट सट्टेबाजीसाठी नागपूर शहर हे नंदनवन समजले जाते. त्यामुळे शहरात आणि आजूबाजूंच्या फार्महाउसवरून क्रिकेट सट्टेबाजीची कोट्यवधींमध्ये खायवाडी-लगवाडी चालत आहे. शहरातील काही पॉश एरियामध्ये आणि मोठमोठ्या हॉटेलमध्ये रूम्स बुक करून सट्टेबाजांनी मुक्‍काम ठोकला आहे.

नागपुरातील काही एजंट्‌सच्या नावाचा हॉटेलमधील रूमसाठी ऑनलाइन बुकिंगसाठी वापर करण्यात आला  आहे. सर्व व्यवहार ऑनलाइन आणि विश्‍वासावर होत असल्यामुळे पैसे लगेच एकमेकांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येतात. तर जुनी लाइनमधील व्यापारी वर्ग तसेच धंदेवाइकांकडून डेली कलेक्‍शन बेसिसवर सट्ट्याची वसुली होते.  

खायवाडीसाठी टाकल्या लाइन
नागपुरातून स्वतः कोट्यधीश असलेल्या सट्टेबाजांनी खायवाडी आणि लगवाडीसाठी वेगवेगळ्या लाइन टाकल्या आहेत. यामध्ये जरीपटक्‍यातील पंकज कढी, आकाश बॅटरी, केवल रामानी, राजू टोपी, गुल, राणी पान शॉपी, बंटी ज्यूस, जॉनी अंडा हे कोट्यवधीत खायवाडी-लगवाडी करतात. तर महल परिसरात फिरोज भाई, गोविंद, अज्जू, सोनू, हाजी, चिटू यांनी लाइन टाकली आहे. खामल्यात मात्र फिक्‍स लाइन असून त्याची मालकी केवल गोलू, कॅनडी, तिरुपती, रिंकू यांना आहे. तर धरमपेठमधील जीतू कमीनानी हा एकटाच सट्टेबाजीचा बादशहा आहे.

सट्टेबाजांशी अर्थपूर्ण संबंध
अनेक सट्टेबाजांची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी सेटिंग आहे. वर्ल्डकपला सुरुवात होऊन पाच दिवस झाले असून पोलिसांनी एकाही सट्टेबाजावर छापा घातला नाही, तसेच आयपीएल स्पर्धेवेळीही पोलिसांनी थातूरमातूर छापेमारी करीत ‘देखावा’ केल्याची चर्चा आहे. पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचेसुद्धा सट्टेबाजांशी अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे छापा पडण्यापूर्वीच सट्टेबाजांपर्यंत माहिती जात असल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com