पावसामुळे क्रिकेटप्रेमी क्‍लीन बोल्ड : "वर्ल्ड कप' सट्टाबाजार

file photo
file photo

यवतमाळ : ट्‌वेंटी-ट्‌वेंटी वर्ल्डकप, लोकसभा निवडणुकीनंतर सटोडियांनी आपला मोर्चा आता "वर्ल्डकप 2019'कडे वळविला आहे. एका सामन्यावर कोट्यवधींच्या घरात उलाढाल होत असल्याने पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. गुरुवारी (ता. 13) भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघांदरम्यान असलेल्या सामन्यावर सट्टा लागला. मात्र, पावसामुळे सट्टेबाज क्रिकेटप्रेमी "क्‍लीन बोल्ड' झालेत. सायंकाळपर्यंत दिलेली ऑनलाइन रक्कम परत मिळविण्यासाठी सट्टेबाजांना चांगलीच कसरत करावी लागली.
सट्टाबाजीत चर्चेत असलेल्या सटोडियांची कुंडली पोलिसांकडे आहे. मात्र, पोलिसांकडून छापेमारी करण्याची हिंमत होताना दिसत नाही. त्यामागे "खालपासून ते वरपर्यंत' अर्थपूर्ण गणित असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात ऐकायला मिळते. गुरुवारी (ता. 13) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यादरम्यान सामना होता. पावसाच्या व्यत्ययाने संध्याकाळी सामना रद्द झाला. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सटोडिये वेगळ्याच अडचणीत सापडले. सामन्यावर लावलेल्या पैशांवरून सट्टेबाज व सटोडियांची चांगलीच दमछाक झाली.
सामना सुरू होण्याच्या अपेक्षेने पैशांची आवक सुरूच होती. प्रत्येक बॉल, विकेट, षटकार, शतक, अर्धशतक, दोनशे, तीनशे धावा, चौकार आदी बाबींवर सट्टा लागला.
हायहोल्टेज सामना रविवारी
भारत विरुद्ध पाकिस्तान असा हायहोल्टेज सामना रविवारी (ता. 16) होणार आहे. या सामन्याची क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारत 2011 व 2015ची पुनरावृत्ती घडवेल, असा विश्‍वास आहे. त्यामुळे यवतमाळ, वणी, मारेगाव, पुसद, उमरखेड, पांढरकवडासह इतर तालुक्‍यांत महासट्टा लागणार आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्याची गरज नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com