नगरसेवक बंटी शेळकेविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

नागपूर - नगरसेवक बंटी शेळके याने ओसीडब्ल्यूचे पर्यवेक्षक यशवंत उरकुडे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी बंटी शेळकेविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

ओसीडब्ल्यूचे वरिष्ठ अभियंता भरत नारायण गावंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महिनाभरापूर्वी ओसीडब्ल्यूकडून महाल कोठी रोड परिसरात नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. परिसरातील काही जुन्या लोकांना नवीन कनेक्‍शन दिले. लोधीवाडा परिसरातील संगीता यांनी यशवंत उरकुडे यांना भ्रमणध्वनी करून नवीन पाइपलाइनमुळे सुयोग भगवंत अपार्टमेंटची इलेक्‍ट्रिक वायर तुटल्याचे सांगितले. 

उरकुडे यांनी खात्री करण्यासाठी पुन्हा खोदकाम केले आणि वायर तुटली नसल्याचे संगीता यांना सांगितले. याच कारणावरून 11 जुलैला सकाळी 10 वाजता नगरसेवक बंटी शेळके यांनी उरकुडे यांना भ्रमणध्वनी करून कार्यालयात बोलाविले. उरकुडे कार्यालयात गेले असता बंटी शेळके यांनी शिवीगाळ केली आणि मोबाईल हिसकावून कानशिलात मारली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून उरकुडे यांनी अपार्टमेंटमधील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या इलेक्‍ट्रिक वायरचे नुकसान झाले नसल्याचे दाखवून दिले. शहानिशा न करता नगरसेवक बंटी शेळके यांनी उरकुडे यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

Web Title: Crime against corporator Bunty Shelke