रजनीश सिंगविरुद्ध आणखी एक गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

नागपूर - पत्नीसह, नातेवाईक, मित्रांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या रजनीश अयोध्याप्रसाद सिंहविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा एमआयडीसी ठाण्यात दाखल झाला. यापूर्वी त्याची पत्नी सुनीता सिंगच्या तक्रारीवरून सदर ठाण्यात गुन्हा दाखल असून, रजनीशला अटक करण्यात आली. 

नागपूर - पत्नीसह, नातेवाईक, मित्रांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या रजनीश अयोध्याप्रसाद सिंहविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा एमआयडीसी ठाण्यात दाखल झाला. यापूर्वी त्याची पत्नी सुनीता सिंगच्या तक्रारीवरून सदर ठाण्यात गुन्हा दाखल असून, रजनीशला अटक करण्यात आली. 

रजनीश सिंगने वेळोवेळी अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला. प्राथमिक चौकशीत आतापर्यंत त्याने आठ लोकांना 5 कोटींचा चुना लावल्याचे पुढे आले. या प्रकरणाचा तपास गुन्हेशाखेच्या प्रॉपर्टी सेलकडून करण्यात येत आहे. मानेवाडा रोड, बजरंगनगर येथील रहिवासी नितीन श्रीवासच्या तक्रारीवरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, नितीनचा बालपणीचा मित्र परशू ठाकूर रजनीशचा नातेवाईक आहे. रजनीशने हिंगणा एमआईडीसीत अलायसन्स नावाची ऍल्युमिनियम फ्रेम बनवणारी आणि मिनरल वॉटरची कंपनी असल्याची थाप मारली. या कंपीच्या आवारातच मिनरल वॉटर भरण्यासाठी लागणाऱ्या रिकाम्या बॉटल तयार करण्याचा प्रकल्प उभारायचा असून, त्यासाठी 50 लाखांची गरज असल्याचे सांगितले. नितीनने पैसे देण्याची तयारी दाखविली. त्यानुसार नितीनच्या नावाने कंपनीची नोंदणी करण्यात आली. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत कंपनीच्या नावे खाते उघडण्यात आले. रजनीशने पूर्वीच काही चेक आणि कागदांवर नितीनच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. त्याचा उपयोग करून रजनीशने बॅंक अधिकाऱ्यांच्या मदतीने 47 लाखांचे कर्ज मंजूर करवून घेतले. स्वाक्षऱ्या असलेल्या चेकचा उपयोग करून नितीनच्या खात्यातील पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळते केले. तेव्हापासून रजनीशचा काहीच पत्ता नव्हता. पत्नीच्या तक्रारीवरून दाखल प्रकरणात त्याला अटक करण्यात आल्यानंतर तक्रारकर्ते पुढे येऊ लागले आहेत. 

Web Title: crime against Rajneesh Singh