esakal | २७ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी व्यवस्थापकासह दहा जणांविरुद्ध गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

२७ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी व्यवस्थापकासह दहा जणांविरुद्ध गुन्हा

२७ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी व्यवस्थापकासह दहा जणांविरुद्ध गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुसद (जि. यवतमाळ) : बँकेचे बनावट खाते तयार करून खात्यातून परस्पर गैरव्यवहार करून तब्बल २७ कोटी ५० लाख ३४ हजार ८६० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वसंतनगर पोलिसांनी बँकेच्या व्यवस्थापकासह एकूण दहा जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Crime-against-ten-persons-including-manager-in-fraud-case-of-Rs-27-crore)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री अजयकुमार मोरय्या (वय ४५, रा. अमरावती) असे तक्रारदाराचे नाव आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींमध्ये नंदकिशोर जुगलकिशोर जयस्वाल, रश्मी जुगलकिशोर जयस्वाल, रवी जयस्वाल, अकोला जनता कमर्शीयल बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक, तत्कालीन लेखापाल, सदाशिव नाना मळघणे, लक्ष्मीकांत चौधरी, रवी धुळधुळे व राजू कांबळे आदींचा सहभाग आहे.

हेही वाचा: दवाखान्यात गेली अन् गर्भवती निघाली; पालक पडले संभ्रमात

संशयितांनी धनादेशावर बनावट स्वाक्षरीचा वापर करून अवैधरित्या मालाची खरेदी करून पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. वसंतनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार रवींद्र जेधे करीत आहेत.

(Crime-against-ten-persons-including-manager-in-fraud-case-of-Rs-27-crore)

loading image