आई वडिलांसमोर तरुणीशी अश्लील चाळे 

अनिल कांबळे
शनिवार, 14 एप्रिल 2018

पीडितेचा हात पकडून त्यांच्यासमोरच तिच्याशी अश्लील चाळे करून विनयभंग केला. यानंतर पीडितेने बजाजनगर ठाण्यात मनोजविरुद्ध तक्रार दाखल केली. आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

नागपूर : बजाजनगर येथील एका 20 वर्षीय तरुणीचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मनोज मुलचंद शाहू (20) याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बजाजनगर हद्दित राहणारी पीडित तरुणी व आरोपी एकाच वस्तीत राहतात. आरोपी मनोजचे तरुणीवर एकतर्फी प्रेम आहे. यातून तो मागील 2 वर्षांपासून तिचा पाठलाग करीत आहे. त्याचा त्रास असह्य झाल्याने तिने याबाबत घरच्यांना माहिती दिली. शुक्रवारी सकाळी 10 वाजता पीडित तरुणीचे आईवडील मनोजच्या घरी त्याला समजवण्यासाठी गेले असता त्याने त्यांना शिवीगाळ केली.

तसेच पीडितेचा हात पकडून त्यांच्यासमोरच तिच्याशी अश्लील चाळे करून विनयभंग केला. यानंतर पीडितेने बजाजनगर ठाण्यात मनोजविरुद्ध तक्रार दाखल केली. आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Crime Girl Molest by a person infront of her parents