तपासात हयगय; गृहसचिवांना दंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

नागपूर - कळमेश्‍वरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे तब्बल 20 दिवस शोषण केल्याप्रकरणी पोलिसांनी तपासामध्ये दाखविलेली हयगय अंगलट आली आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी गृहविभागाचे सचिव, पोलिस अधीक्षक आणि कळमेश्‍वर पोलिस स्टेशनचे अधिकारी यांना प्रत्येकी 21 हजार रुपये दंड ठोठावला.

प्रकरणातील आरोपी नीरजसिंग सोळंकी हा मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. आरोपीने 9 ऑगस्ट 2010 रोजी पीडित मुलीचे अपहरण करून तिला आसामला घेऊन गेला. तिथे त्याने मुलीचे 20 दिवस शोषण केले. मुलीच्या अपहरणाबाबत तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती त्याला कळली. यामुळे त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. याप्रकरणी पोलिसांनी केवळ अपहरणाचा गुन्हा नोंदविला. तसेच काही दिवसांनी आरोपीला सोडून दिले. या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी दाखविलेला निष्काळजीपणा लक्षात घेत पीडितेच्या भावाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करत निष्काळजीपणावर ताशेरे ओढले.

Web Title: crime in nagpur