सात लाख लांबविणारा चोरटा गजाआड 

file photo
file photo

नागपूर : हैदराबाद येथील बिस्कीट कंपनीतून कामगारानेच सात लाखांची रोख चोरली. रेल्वेतून पळून जात असताना नागपूर लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून सुमारे सहा लाखांची रोख आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेला मोबाईलही हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेमुळे "कानून के हात बहोत लंबे होते है', ही हिंदी चित्रपटातील डायलॉग पुन्हा अधोरेखित झाला. 
दिनेशकुमार चौधरी (20) रा. कटघोरी, कोरबा, छत्तीसगड असे चोरट्याचे नाव आहे. तो आणि त्याचा भाऊ हैदराबादच्या आनंद फुड्‌स कंपनीत बिस्कीट बनविण्याचे काम करतात. कामगारांचे वेतन देण्यासाठी कंपनीचा व्यवस्थापक 7 लाखांची रोख घेऊन आला आणि आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवली. याची पुरेपूर माहिती चौधरीला होती. संधी मिळताच तो रोख चोरून पळून गेला. घटनेपासूनच चौधरी फरार असल्याने त्यानेच रक्कम लांबविल्याचे स्पष्ट होते. आंध्रप्रदेशातील साहिदाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत चोरट्याचा शोध सुरू केला. दरम्यान चोरटा हैदराबादहून वरंगल आणि वरंगलहून वर्धेला आला. याबाबत आंध्रप्रदेशच्या पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी याबात नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हेशाखेला कळविले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक घनश्‍याम बळप यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संदीप जाधव, एपीआय चौधरी, हवालदार दीपक डोर्लिकर, रवींद्र सावजी, विनोद खोब्रागडे यांनी रेल्वे गाड्यांची झाडाझडती सुरू केली. तपासणी करीत असताना आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास चोरटा अखेर वर्धा रेल्वे स्थानकावर संशयास्पद अवस्थेत आढळला. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 5 लाख 90 हजार 820 रुपये रोख आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेला मोबाईल आढळला. कायदेशीर प्रक्रियेनंतर चोरट्याला साहिदाबादचे पोलिस निरीक्षक पी. सूरेश यांच्या ताब्यात देण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com