अश्‍लील चित्रफिती आणि बदनामीची भीती

File photo
File photo

नागपूर : आर्थिक परिस्थिती आणि झकपक राहणीमानाचे आमिष दाखवून अनेक मुलींना महिला दलाल देहव्यापाराच्या दलदलीत ओढतात. तिचा सौदा करण्यापूर्वीच तिची मोबाईलने अश्‍लील चित्रफीत बनवली जाते. त्यानंतर तिने ग्राहकासोबत जाण्यास नकार दिल्यास तिला "एमएमएस' सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामीची भीती दाखविली जाते. एकदा दलदलीत फसल्यानंतर मुलींचे बाहेर पडण्याचे मार्गच बंद केले जातात.
शहरातील सेक्‍स रॅकेटचा भंडाफोड केल्यानंतर अनेकांनी काही दिवसांसाठी देहव्यापार बंद केला. मात्र, ब्यूटीपार्लरमधील देहव्यापार अजूनही जसाच्या तसा सुरू आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या डोळ्यांत धूळ फेकून ठाणेदार आणि डीबीचे कर्मचारी सेक्‍स रॅकेटला परवानगी देतात. कोट्यवधीत असलेल्या देहव्यापारात अनेक आंबटशौकीन राजकीय नेते, पोलिस आणि तथाकथित समाजसेवकांना हिस्सेवाटणी दिली जाते. यासोबत त्यांना दर महिन्याला "स्पेशल मसाज' लाच स्वरूपात दिली जात असल्याची माहिती आहे. नागपुरातील आर्थिक स्थिती योग्य नसलेल्या मुलींना हेरून झटपट पैसा कमविण्याचे आमिष महिला दलाल देतात. त्यानंतर ब्यूटीपार्लरमध्ये नोकरी करीत असल्याचे सांगून मुली पैशासाठी देहव्यापारात उडी घेतात. मात्र, काही दिवसांतच या व्यवसायातील कटुसत्य त्यांना कळते. परंतु, तोपर्यंत या व्यवसायातून बाहेर पडणे त्यांना अशक्‍य असते. अनेक विवाहित महिला पतीच्या लपून देहव्यापारात येतात. आर्थिक स्थिती बरी झाल्यानंतर त्या काम करण्यास नकार देतात. त्यांना पतीला सांगण्याची किंवा एमएमएस व्हायरल करण्याची भीती दाखवत असल्याने त्या अजूनही व्यवसायात खितपत पडल्या आहेत.
विद्यार्थिनींना अमली पदार्थांचे व्यसन
महिला दलाल महाविद्यालयीन मुलींना देहव्यापारात आणतात. पहिल्या ग्राहकासाठी त्यांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्‍कम दिली जाते. झटपट पैसा कमविण्याच्या नादात मुली स्वतःहून दलालांना फोन करून सहमती दर्शवितात. याचाच फायदा दलाल घेतात. त्यांना ड्रग्ज, दारू, हुक्‍का आणि अमली पदार्थांचे व्यसन लावतात. व्यसनात बुडालेल्या मुली शेवटी शिक्षण सोडून देहव्यापारात गुंतून पडतात.
गुन्हे शाखेचा "ड्रामा'
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडे ज्येष्ठ नागरिक सेल, बेगर पथक, मिसिंग, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक आणि सेवा सेल इत्यादी कामांचा डोंगर आहे. तसेच जेमतेम कर्मचारी एसएसबीमध्ये आहेत. त्यामुळे सेक्‍स रॅकेटवर छापे घालत नसल्याचा दावा पोलिस करतात. मात्र, प्रत्यक्षात एसएसबी आणि ठाणेदार तसेच डीबी पथक "सेट' असल्यामुळेच शहरात देहव्यापाराचे लोण फोफावले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com