Crime News : विहिरीत सापडलेल्या अवयवांचा अखेर उलगडा; पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून केले...

Crime News
Crime NewsEsakal

अमरावती : जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या वरुड येथील मानवी अवयव विहिरीत सापडण्याच्या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. अनैतिक संबंधातून हे प्रकरण घडले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात महिलेसह एक पुरुष, अशा दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Crime News
Mumbai Crime : 'कुत्तो को ऐसे मत छोडो...', असे म्हणताच ज्येष्ठ नागरिकावर चाकूने वार

वरुड नजीकच्या शहापूर येथील ज्ञानेश्वर किसनराव कुमरे (वय ४२) व एका महिलेला पोलिसांनी याप्रकरणात अटक केली. १४ मे रोजी ग्राम एकलविहीर येथे राजेंद्र ढोके यांच्या विहिरीत अनोळखी इसमाची हाडे पोत्यात भरून टाकलेली आढळून आली होती. त्यावेळी त्याचे मुंडके धडावेगळे असल्याचे दिसून आले.

मृतक कोण असावा, याचा पत्ता लागत नसल्याने याप्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. वरुड पोलिसांनी याप्रकरणात खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी घटनास्थळास भेट देत पाहणी केली व माहिती घेत वरुडचे ठाणेदार प्रदीप चौगावकर यांना मार्गदर्शन केले.

तपासाची दिशा निश्चित करीत असताना परिसरातील हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यापासून प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी एकलविहीर येथील शेषराव वासुदेव इरपाची हा काही महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. हाच धागा पकडून पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. शेषरावच्या पत्नीचा शोध घेतला असता ती शहापूर येथे राहत असल्याचे समजले. त्यांनी तिच्याकडे चौकशी सुरू केली. तिला मृत शेषरावचे कपडे दाखविले असता तिने ते कपडे शेषरावचेच असल्याची कबुली दिली.

Crime News
Sharad Pawar: शरद पवारांनी ज्येष्ठ नेत्यांना दिल्या सूचना; बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी

पोलिसांचा याप्रकरणातील संशय वाढत गेल्याने त्यांनी ही महिला ज्याच्यासोबत राहत होती त्याची चौकशी सुरू केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्ञानेश्वर व महिलेने कट रचून शेषरावची हत्या केली. ही हत्या इतक्या अमानुष पद्धतीने करण्यात आली की कुऱ्हाडीने आधी शेषरावचे मुंडके धडावेगळे करून उर्वरित शरीराचे तुकडे करण्यात आले व ते पोत्यात भरून विहिरीत फेकून देण्यात आले. या हत्येची दोघांनीही कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात वरुडचे ठाणेदार प्रदीप चौगांवकर, उपनिरीक्षक धीरज राजूरकर यांच्या पथकाने याप्रकरणाचा छडा लावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com