राकाँच्या महिला पदाधिकाऱ्यांविरुद्घ अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

राकाँच्या महिला पदाधिकाऱ्यांविरुद्घ अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

महागाव (जि. यवतमाळ) : बचत गटातील महिला सदस्यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्‍यासह पती व दोन मुलांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या आजी-माजी तालुकाप्रमुखावर खंडणीसह विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

महिला पदाधिकारी इजनी येथील त्रिमूर्ती बचत गटाच्या अध्यक्ष आहेत. १६ वर्षांपासून गट कार्यरत आहे. वंदना वाघमारे या बचत गटात सदस्य आहेत. या गटामार्फत इजनी येथे स्वस्त धान्य दुकान तसेच महागाव येथे शिवभोजन थाळी केंद्र चालविण्यात येते. दोन्ही योजनांमध्ये त्रिमूर्ती बचत गटातील सदस्य महिलांना अंधारात ठेवून महिला पदाधिकाऱ्‍यांनी आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप आहे.

राकाँच्या महिला पदाधिकाऱ्यांविरुद्घ अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा
रात्रीच्या अंधारात बोकड चोरला, कापला अन् मालकालाच विकला

सोमवारी (ता. २०) अन्यायग्रस्त महिला सदस्यांनी तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयात धडक देत तक्रार दिली. यावेळी महिला पदाधिकारी व त्यांची मुलेही तेथे होती. शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद भरवाडे, रवींद्र भारती, केदार पानपट्टे, शंकर टेटर, सतीश हराळे हेसुद्धा उपस्थित होते. बचत गटातील अनागोंदी कारभाराची तक्रार देण्यासाठी सदस्य महिलांना का आणले, असे म्हणत राकाँ पदाधिकाऱ्‍यांनी शिवीगाळ केली.

अष्टविनायक नरवाडे याने केदार पानपट्टे यांना मारहाणही केली. वंदना वाघमारे यांच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला. तर राकाँच्या महिला पदाधिकारी यांचा विनयभंग करून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रमोद भरवाडे आणि माजी तालुकाप्रमुख रवींद्र भारती यांच्याविरुद्घ महागाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

राकाँच्या महिला पदाधिकाऱ्यांविरुद्घ अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा
पतीने वाचविला दोघींचा जीव अन् पत्नी गेली वाहून, मग...

महिला पदाधिकारी काही नागरिकांना घेऊन सभापतींना भेटण्यासाठी महागाव पं.स. कार्यालयात आल्या होत्या. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रेशन दुकान आणि शिवभोजन थाळी केंद्राचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला. तसेच पाच लाखांची खंडणी मागितली. भरवाडे व भारती यांच्याविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com