Vidarbha : चिखलीत वाढतोय क्राईम रेटCrime rate rising in the mud | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

चिखलीत वाढतोय क्राईम रेट

चिखली : व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरापैकी एक असलेल्या चिखली शहरासह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून क्राईम रेट इतका वाढला आहे की, दिवसाढवळ्या खून आणि हल्ले लूटीसाठी व्यापाऱ्यांवर होत आहे. यासोबतच, परिसरात चोऱ्या आणि मारहाण होण्याची प्रकार वाढल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. येथील जयस्तंभ चौकातील आनंद इलेक्ट्रॉनिकमध्ये १६ नोव्हेंबरला रात्री १० ते १०.१५ वाजेच्या सुमारास सशस्त्रासह दरोडेखोरांनी दुकानात घुसून कमलेश पोपट यांची हत्या केली.

जिल्ह्यात चिखली तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दरोडे, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच केळवद येथील स्टेट बँक लूटीची घटना घडली. त्याअगोदर, दिवाळीत कापड व्यापाऱ्याला भरगर्दीत शस्त्राचा धाक दाखवित लूटण्यात आले तर, १६ नोव्हेंबरला रात्री पावणेदहाच्या सुमारास रात्री कमलेश पोपट हे दुकान बंद करण्याची तयारी करत असताना त्यांनी दुकानाचे मुख्य शटर बंद केले. बाजूचे लहान शटर उघडे असताना तिघे दुचाकीने दुकानासमोर आले. त्यातील एक व्यक्ती बाहेर थांबला तर दोघे ग्राहक बनून दुकानात शिरले. त्यांनी श्री.पोपट यांच्याशी झटापट करत पोटावर चाकूचे वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर काउंटरमधील रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला असून, एक चोरटा दुकानाबाहेर लक्ष ठेवण्यासाठी थांबलेला होता. दरोडेखोरांनी तोंडावर स्कार्फ बांधल्याचे दिसते. अचानकपणे झालेल्या या हल्ल्यामुळे दुकानाच्या शहरजवळ ते पडलेले असतांना रस्त्यावरून जाणाऱ्यांना कमलेश पोपट यांना जमिनीवर तडफडताना पाहताच शहरातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोपट यांच्या कुटूंबियांसह पोलीसांना सूचना देत तातडीने त्यांना एका खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तेथे मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अशोक लांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळी याप्रकरणी मुलगा ममन पोपट यांच्या तक्रारीवरुन खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. एसपी श्रावण दत्त, बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. यावेळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले मात्र श्वान दुकानाभोवतीच घुटमळले. रात्रीच नाकाबंदी करण्यात आली होती.

व्यापाऱ्यांनी पुकारला चिखली बंद

दिवसाढवळ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या इलेक्ट्रॉनिक दुकानमालकाच्या हत्त्येमुळे शहरातील सर्व व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे. व्यापारी संघटनांनी आज (ता. १७)चिखली बंदचे आवाहन केले असुन शहरातील सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात घरफोड्या, दुकानांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये कमलाची वाढ झाली असुन पोलिसांचा धाक गुन्हेगारांना उरला नसल्याचे दिसत आहे. श्री.पोपट यांच्या हत्त्येच्या निर्षधार्थ व्यापाऱ्यांसह शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी निषेध व्यक्त करीत प्रशासनावर आपला रोष व्यक्त केला आहे.

टॅग्स :vidarbha