त्या 11 विदेशी नागरिकांवर अखेर गुन्हा दाखल

corona
corona

चंद्रपूर : येथील तुकूम परिसरातील एका मशिदीमध्ये आढळलेल्या ११ विदेशी नागरिकांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांची विलगीकरण कक्षात रवानागी करण्यात आली आहे. त्यांना मिळालेल्या पर्यटन व्हिसाचा त्यांनी गैरवापर केल्यावरून ही कारवाई पोलिसांनी केली.
कोरोनाचा संसर्ग पसरवू नये म्हणून प्रशासनाच्यावतीने कठोर अंमलबाजवणी केली जात आहे. विदेशी व दुसर्या राज्यातून आलेल्यां नागरिकांनी स्वत: माहिती देण्याचे आवाहन केले होते. २५ मार्चला तुकूम परिसरातील एका मशीदीमध्ये अकरा  र्किरकीस्तानी आणि दिल्ली, ओडिसा  येथील प्रत्येकी एक असे एकूण १३ व्यक्ती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी प्रशासनाला आल्याची माहिती दिली नाही. याकारणावरून या अकरा जणांना अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर त्यांच्याकडे व्हिसा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले.

दरम्यान त्यांच्याकडे असलेला व्हिसा हा पर्यटनासाठी असल्याची बाब समोर आली. मात्र ते धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे तपासात पुढे आले. त्यानंतर काल बुधवारला रात्री  शहर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर विदेशी नागरिक अधिनियम कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com