महादेवखोरीत गुंडांचा हैदोस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

अमरावती - पतीच्या पश्‍चात दोन चिमुकल्यांसह राहणाऱ्या तरुणीची इभ्रत लुटण्याच्या इराद्याने धडकलेल्या दोन मद्यपी गुंडांनी तब्बल अडीच तास हैदोस घातला. त्या महिलेच्या बचावासाठी आलेल्या तिच्या पुतण्यावर त्यांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला; तर दुसऱ्या महिलेच्या घरात शिरून तिच्या पतीला चाकूच्या धाकावर ओलिस ठेवत त्या महिलेचा विनयभंग केला. मदतीसाठी पोहोचलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावरसुद्धा चाकूने वार करण्यात आला. स्थानिक महादेवखोरी येथे मंगळवारी (ता. 25) पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. 

दीपक विठ्ठल आसटकर (वय 40; रा. महादेवखोरी), रूपचंद फुलचंद बमनेल (वय 35; रा. मसानगंज) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. परिसरातील एका सुस्वरूप तरुण महिलेच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. ती आपल्या दोन अपत्यांसह महादेवखोरी परिसरात वास्तव्याला आहे. दीपक आसटकर याची पत्नी दीड महिन्यापासून निघून गेलेली आहे. दीपकने रूपचंद याला सोबत आणून पहाटे साडेतीनच्या सुमारास संबंधित महिलेच्या घरात शिरण्यासाठी लाथा मारून घराचे दार तोडण्याचा प्रयत्न केला. महिलेने पुतण्या सूरज (वय 26) आणि शेजारी महिलेला भ्रमणध्वनीद्वारे माहिती देत त्यांना मदतीसाठी बोलावले. सूरज हा मदतीसाठी येताच दोन्ही मद्यपींनी त्याच्या पोटावर चाकूने वार केला. त्यापाठोपाठ आलेल्या शेजारी महिलेचा पाठलाग केला व तिच्या घरात शिरून पतीला चाकूच्या धाकावर एकाने ओलिस ठेवले; तर दुसऱ्याने त्या महिलेस बाथरूममध्ये खेचत तिचा विनयभंग केला. नियंत्रणकक्षामार्फत या घटनेची माहिती मिळताच रात्रकालीन गस्तीवर असलेले सहायक आयुक्त मिलिंद पाटील, बडनेराचे ठाणेदार दिलीप पाटील आणि नियंत्रणकक्षाचे गस्ती वाहन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेची गुंडांच्या तावडीतून सुटका केली. यादरम्यान नीतेश पवार या पोलिसाच्या हातावर चाकूने वार करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही गुंडांवर नियंत्रण मिळवीत त्यांना ताब्यात घेतले. 

Web Title: criminal in amravati