नागपूर - माजी महापौरांसह दोन नगरसेवकांवर गुन्हे दाखल 

अनिल कांबळे
सोमवार, 9 एप्रिल 2018

नागपूर : एम्प्रेस मॉल परीसरातील विहिरीत मृत्यू पावलेल्या तीनही मजुरांचे मृतदेह मॉलमध्ये ठेवून गैरकायद्याची मंडळी जमवून तणाव निर्माण करून विनापरवानगी निदर्शने केल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी माजी महापौरासह दोन नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना ऊत आला आहे. 

शनिवारी दुपारी एम्प्रेस मॉल परीसरातील विहिरीची साफसफाई करताना विषारी वायूमुळे दिपक गवते (वय 42 रा. सुगतनगर) हा प्लंबर उतरला, पण अचानक श्वास गुदमरल्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला वाचविण्यासाठी उतरलेल्या चंद्रशेखर बारापात्रे (वय 40) आणि अजय गारुडी (वय 43) या दोघांचा मृत्यू झाला. या तिनही मजुरांच्या मृतदेहांचे रविवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले व त्यानंतर त्यांचे पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

संतप्त कुटुंबीयांनी काही राजकीय पक्षाच्या नेत्याने फूस लावल्याने त्यांचे मृतदेह सरळ एम्प्रेस मॉलमध्ये आणून ठेवले. यावेळी आक्रमक पवित्र्यामुळे मॉलमध्ये एकच खळबळ उडाली. माजी महापौर प्रवीण दटके, नगरसेवक बंटी शेळके, रमेश पुणेकर,सुभाष ढबाले, नितीन मेश्राम, नितीन कानोरकर, सुरेश गोजे यांनी पक्षातील 60 ते 70 कार्यकर्ते एम्प्रेस मॉलमध्ये बोलावले. तेथे नारे-निदर्शने केली. मृतकांच्या कुटुंबीयांना त्वरीत आर्थिक मोबदला द्या, अन्यथा मृतदेह हलविणार नाही. अशी भूमिका घेतल्यामुळे मॉलमध्ये एकच खळबळ उडाली होती. राजकीय नेत्यांच्या भूमिकेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता.

पोलिसांनाही दमदाटी कार्यकर्ते करीत होते. पोलिसांच्या आदेशाचे पालन न करता गैरकायद्याची मंडळी जमविल्यामुळे माजी महापौर, नगरसेवकांसह 70 कार्यकर्त्यांवर गणेशपेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. 

Web Title: Criminal cases filed against two corporators, including former Mayor in nagpur