धामणगावरेल्वे बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

अमरावती : शेतमाल तारण अफरातफर प्रकरणात दत्तापूर पोलिसांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सचिव, लेखापाल यांच्यासह 17 संचालकांवर आज, शनिवारी गुन्हे दाखल केले आहेत.

अमरावती : शेतमाल तारण अफरातफर प्रकरणात दत्तापूर पोलिसांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सचिव, लेखापाल यांच्यासह 17 संचालकांवर आज, शनिवारी गुन्हे दाखल केले आहेत.
धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या तारण योजना प्रकरणात वरिष्ठ आदेशावरून लेखापरीक्षण अधिकारी अशोक माकोडे यांनी 3 जुलै रोजी सभापतींसह अन्य लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार दाखल केली होती. मात्र, या तक्रारीबाबत दत्तापूर पोलिसांनी जिल्हा उपनिबंधकांकडून माहिती मागितली होती. त्यावरून सभापती, सचिव, रोखपाल, गोडाऊन किपर व संचालकांविरोधात दत्तापूर पोलीस ठाण्यात सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक अशोक माकोडे यांच्या तक्रारीवरून आज, शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले असून अधिक तपास दत्तापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र सोनवणे करीत आहेत.
कारवाई अन्यायपूर्ण
शेतमाल तारण योजनेत जवळपास 2 कोटी 62 लाख रुपये वसूल झाले आहे. कारवाई अन्यायपूर्ण आहे. या कारवाईविरोधात दाद मागणार, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मोहन इंगळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminal Investigations of dhamangaon railway agriculture market commity directors