पाकिस्तानी दाम्पत्यांविरूद्ध जरीपटक्‍यात गुन्हा 

अनिल कांबळे 
गुरुवार, 29 मार्च 2018

व्हिजा संपल्यानंतरही बेकायदेशिररित्या भारतात वास्तव्य केले. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी दामत्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

नागपूर - तात्पुरत्या व्हिजावर भारतात आलेल्या दामत्याने बनावट कागदपत्रे तयार करून पासपोर्ट कार्यालयाची फसवणूक केली. तसेच नव्याने पासपोर्ट मिळविण्यासाठी नागपूर विशेष पोलिस शाखेत बनावट कागदपत्रे सादर केली. व्हिजा संपल्यानंतरही बेकायदेशिररित्या भारतात वास्तव्य केले. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी दामत्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. विमक्रमदास भजनदास पंचवानी आणि जयवंती विक्रमदास पंचवानी असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे.

Web Title: Criminal offense against Pakistani couples in nagpur