चौकात लावले जाईल तडीपारांचे फोटो

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

अमरावती : सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र आणि त्याच कालावधीत येणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यापुढे ठेवून शंभरपेक्षा अधिक सराईतांवर हद्दपारीची कारवाई होईल. त्यांच्या फोटोंचे फलक चौकात लावल्या जाईल, अशी घोषणा पोलिस आयुक्त संजय बावीस्कर यांनी केली.

अमरावती : सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र आणि त्याच कालावधीत येणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यापुढे ठेवून शंभरपेक्षा अधिक सराईतांवर हद्दपारीची कारवाई होईल. त्यांच्या फोटोंचे फलक चौकात लावल्या जाईल, अशी घोषणा पोलिस आयुक्त संजय बावीस्कर यांनी केली.
सीपींसह, उपायुक्त यशवंत सोळंके यांनी त्याला दुजोरा दिला. नागरिकांना अशा लोकांची माहिती व्हावी, त्यांच्याकडून पोलिसांना आवश्‍यक माहिती कळावी म्हणून हा प्रयोग केल्या जाईल. यापूर्वी केवळ प्रत्येक ठाण्यामध्ये अशा लोकांचे फोटो फलकावर लावल्या जात होते. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या काळात शहर पोलिसांनी 92 जणांना जिल्ह्याबाहेर हद्दपार केले होते. त्यापैकी 52 जणांचा हद्दपारीची कालावधी हा 31 डिसेंबर 2019 रोजी पूर्ण होईल. त्यामुळे एवढे लोक सद्य:स्थितीत हद्दपार आहेतच. त्या व्यतिरिक्त दोन्ही उपायुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याची संख्या आणि त्यात सहभागी लोकांची यादी अपडेट करण्याची कारवाई सुरू आहे. त्यामुळे वर्षभरासाठी हद्दपार केल्या जाणाऱ्यांची संख्या निश्‍चितच वाढलेली दिसेल. सार्वजनिक सण उत्सव व निवडणुका डोळ्यापुढे ठेवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये याकरिता टॉपटेन, टॉप ट्‌वेंटी गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे काम सुरू झाले. ज्यांच्याविरुद्ध हद्दपारीची कारवाई केल्या जाणार आहे. त्यापैकी जवळपास वीस जणांना नोटीससुद्धा बजावली आहे. या व्यतिरिक्त दोन सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (एमपीडीए) अंतर्गतसुद्धा कारवाई होणे येत्या काळात अपेक्षित आहे. निवडणुकीच्या काळात पांढऱ्या पोषाखात वावरणाऱ्यांपैकी अनेकांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्धही कारवाई अपेक्षित असल्याचे उपायुक्त सोळंके म्हणाले.

रेकॉर्ड तपासणीचे काम जोरावर
पोलिसांवर येत्या काळात कामाचा ताण राहील. त्यामुळे पूर्वीच ठाण्याच्या स्तरावर सराईतांचे रेकॉर्ड तपासणीचे काम जोरावर सुरू असल्याचे पोलिस आयुक्त बाविस्कर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criminals photo to be publish in city