तडीपार आरोपीचा मुलीवर अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नागपूर - तडीपार आरोपीने नवव्या वर्गाच्या विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली. प्रवीण मोहन बक्‍सरे (वय 26, रा. बारासिग्नल, इमामवाडा) असे आरोपीचे नाव आहे. 

नागपूर - तडीपार आरोपीने नवव्या वर्गाच्या विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करण्यात आली. प्रवीण मोहन बक्‍सरे (वय 26, रा. बारासिग्नल, इमामवाडा) असे आरोपीचे नाव आहे. 

पीडित 14 वर्षीय मुलगी कुंजल (बदललेले नाव) अजनीतील एका शाळेत नवव्या वर्गात शिकते. 4 ऑगस्टला ती नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली होती. सकाळी साडेअकराला ती शाळेतून पायी घरी जात होती. दरम्यान, आरोपी प्रवीण बक्‍सरे याने तिला रस्त्यावर अडविले. दुचाकीवर बसण्यास सांगितले. तिने नकार देताच त्याने चाकू दाखवला आणि तिच्या आई-वडिलाला जीवे मारण्याची धमकी दिली. भीतिपोटी कुंजल प्रवीणच्या गाडीवर बसली. प्रवीणने इमामवाड्यात राहणाऱ्या एका मित्राच्या घरी नेले. तेथे तिच्यावर बळजबरीने पहाटेपर्यंत बलात्कार केला. पहाटेच्या सुमारास तिला रस्त्यावर सोडून प्रवीणने पळ काढला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत प्रवीणला अटक केली. प्रवीणला 5 डिसेंबर 2017 ला दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. 

जीवे मारण्याची धमकी 
प्रवीण गेल्या अनेक महिन्यांपासून कुंजलच्या मागे लागला होता. मात्र, ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आई-वडिलाचा भरचौकात खून करण्याची धमकी दिली. धमकीला घाबरल्यामुळे कुंजलने घरी कुणाला सांगितले नाही. मात्र, शेवटी तिने प्रवीणने लैंगिक शोषण केल्याचा पाढा आईपुढे वाचला. 

तडीपार मोकाट कसे? 
शहरातून अनेक तडीपार झालेले गुंड बिनधास्तपणे मोकाट फिरत आहेत. त्यासाठी पोलिस दलातील काही अधिकारी आणि कर्मचारी "डील' करतात. शहरात राहण्यासाठी तडीपार गुंडांकडून पोलिस पैसे घेऊन सुविधा उपलब्ध करून देत असल्याने त्यांची हिंमत वाढली आहे. ते शहरात राहतच नाही, तर गुन्हेगारी जगतातही सक्रिय असल्याचे या घटनेने अधोरेखित केले. 

Web Title: crinimal torture girl in nagpur