खरिपानंतर आता रब्बीवरही अवकाळीचे संकट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

खरिपात अतिपावसाने हाती आलेले सोयाबीन पीक खराब झाले. कपाशी ला ही झटका बसला. यातून सावरण्यासाठी रब्बीचा हंगाम साथ देईल असे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यावर अवकाळी पावसाचे संकट उभे राहले आहे. 

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : तालुक्यातील रब्बी हंगामावर अवकाळी पावसाचे संकट दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत नऊ हजार हेक्टर पर्यत रब्बी पिकाची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडे आहे. यामध्ये गहू, हरभरा, कांदा व इतर पिकांचा समावेश आहे.

यंदा पावसाळा भरपूर व तालुक्यात जलयुक्त शिवार अंतर्गत खोलीकरणाची कामे झाली असल्याने पाणी अडविण्याचे प्रमाण वाढले. परिणामी, तालुक्यात भूगर्भातील पाण्याची पातळी गत वर्षी पेक्षा वाढलेली दिसत आहे. म्हणून प्रथमच यंदा रब्बी पीक लागवडसाठी शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. खरिपात अतिपावसाने हाती आलेले सोयाबीन पीक खराब झाले. कपाशी ला ही झटका बसला. यातून सावरण्यासाठी रब्बीचा हंगाम साथ देईल असे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यावर अवकाळी पावसाचे संकट उभे राहले आहे. 

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी खुशखबर, मिळणार सवलती

अवकाळी पावसाची हजेरी
दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण अवकाळी पावसाने तालुक्यात हजेरी लावली. यामुळे कोवळ्या अवस्थेत असलेली कांदा रोपे, गहू, हरभरा सह इतर पिकांवर दुष्परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली असताना शेती व्यवसायात रिक्स घेऊन मशागतीसाठी महागडा खर्च करून रब्बीची आशा असलेल्या शेतकऱ्याचे संतुलन बिघडत आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना धीर देणे गरजेचे दिसत आहे. 

अधिक वाचा - शिवारात दिसला बिबट अन् गावात पसरली दहशत

शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी
खरीप हंगामातील मदत व पीक विमा अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतांना दिसत नाही. यासाठी संबंधित प्रशासनाची दिरंगाई शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाची मालिका नव्या वर्षात ही शेतकऱ्यासाठी कायमच दिसत असल्याने आर्थिक विकासाचा प्रश्न निर्माण होत आहे. बदलत्या वातावरणामध्ये कृषी विद्यापीठ अथवा विज्ञान केंद्र आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देणे गरजेचे दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crisis of rabbi season after the kharif