विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी, वादळवाऱ्यामुळे पिकांची नासाडी

crop damaged due to heavy rain and thunderstorm in vidarbha
crop damaged due to heavy rain and thunderstorm in vidarbha

नागपूर : विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात तुरळक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गत आठवडाभरापासून गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. कधीकधी तुरळक पाऊस हजेरी लावत आहे. या बदलत्या वातावरणाचा रब्बी पिकांना फटका बसला असून, कांदा पिकाला कीड लागण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, हवामान खात्याने १८ ते २१ मार्चपर्यंत जिल्ह्यात गारपिटीची शक्‍यता वर्तविली होती. त्यानुसार, गारपीट झाली नसली; तरी वादळवाऱ्यासह तुरळक पावसाने हजेरी लावली. सोमवारी रात्री वादळवारा अन्‌ क्षणात बहुतांश तालुक्‍यांत पावसाला सुरुवात झाली. गोंदिया शहरासह अन्य तालुक्‍यांत मंगळवारी सकाळी पाऊस सुरू होता. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, लाखोळी, जवस, वाटाणा आदी रब्बी हंगामातील पिके धोक्‍यात आली आहेत. कांदा पिकावर करपा, खोडकिडा व अन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. शिवाय बदलत्या वातावरणाचा मानवी आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्‍यता असून सर्दी, ताप, खोकला या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी तुरळक पाऊस झाला. वर्धा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांतील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मंगळवारी (ता. 23) पहाटेपासून वर्धा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. वघाळा, टाकळी (किटे), खरांगणा (गोडे), जयपूर. कुटकी, तळोदी, कोपरा यासह इतर गावांत शेतकऱ्यांचा चणा काढणे सुरू आहे. या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com