esakal | बनावट सही करून पीकविम्याची रक्कम उडविली 
sakal

बोलून बातमी शोधा

fraud

आरंभी येथील विनोद राजूसिंग राठोड या तरुण शेतकऱ्याचे दिग्रस येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत खाते आहे. त्यांच्या खात्यात पीकविम्याची दहा हजार दोनशे रुपये इतकी रक्कम जमा झाली होती.

बनावट सही करून पीकविम्याची रक्कम उडविली 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिग्रस (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील आरंभी येथील एका युवा शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली पीक विम्याची रक्कम अज्ञात व्यक्तीने खोटी आणि बनावट सही करून उडविली. हा प्रकार येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या दिग्रस शाखेत उघडकीस आला. त्यामुळे त्रस्त शेतकऱ्याने दिग्रस पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

आरंभी येथील विनोद राजूसिंग राठोड या तरुण शेतकऱ्याचे दिग्रस येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत खाते आहे. त्यांच्या खात्यात पीकविम्याची दहा हजार दोनशे रुपये इतकी रक्कम जमा झाली होती. मात्र, 2 जून 2020 रोजी अज्ञात व्यक्तीने विनोद राठोड यांची खोटी आणि बनावट सही विड्रॉलवर करून खात्यातून दहा हजार दोनशे रुपये काढून फसवणूक केली. त्यामुळे राठोड यांचे नुकसान झाले.

अवश्य वाचा- काकूच्या प्रेमात आकंठ बुडाला पुतण्या, काका ठरत होता अडसर... मग

याबाबत पीडित शेतकऱ्याने 8 जून रोजी बॅंकेत जाऊन विड्रॉल टाकला असता खात्यात रक्कम नसल्याचे बॅंकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्याने सोमवारी (ता.15) बॅंकेकडे न्याय मिळण्यासाठी अर्ज केला. तरीही कोणतीच हालचाल होत नसल्याचे पाहून अखेर त्या शेतकऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार केली. 
 

loading image
go to top