वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या हातावर बँकांकडून पीककर्जाच्या तुरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

अकोल्यात १५७ कोटी पीककर्ज वाटप
अकोला जिल्ह्यात खरिपात १३३४ कोटी रुपये वाटप करण्याचे उद्दीष्ट बँकांना देण्यात अाले. यात जिल्हा मध्यवर्ती बँक ६८३ कोटी, राष्ट्रीयकृत बँकांना ५२७, खासगी बँका ४७ अाणि ग्रामीण बँकेला ७५कोटी रुपयांचे उद्दीष्ट अाहे. जिल्ह्यात अातापर्यंत १५७ कोटींचे म्हणजेच उद्दीष्टाच्या केवळ १२ टक्के पीककर्ज वितरीत झाले. यात जिल्हा बँकेंचा सर्वाधिक १२२ कोटी रुपयांचा वाटा अाहे. उर्वरित इतर बँकांनी मिळून केवळ ३५ कोटी रुपये वाटप केले.

अकोला  ः पश्‍चिम विदर्भातील तीन जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट ४५५४ कोटी असताना प्रत्यक्षात आतापर्यंत ३२८ कोटीच पीक कर्जाचे वाटप झाले आहे. पेरणीची लगबग सुरू झाली असताना पीककर्ज वाटपात बँका आणि तूर व हरभरा खरेदीत सरकार शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देत असल्याची स्थिती आहे.

वऱ्हाडातील अकोला, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये पीककर्ज वाटपात सर्वत्र सावळागोंधळ सुरू आहे. तीन जिल्ह्ये मिळून ४५५४ कोटी रुपये खरिपासाठी वितणाचे उद्दीष्ट असताना अातापर्यंत ३२८ कोटी रुपये वाटप झाले आहे.

बुलडाण्यात ६५ कोटीच वाटप
बुलडाणा जिल्ह्यात १७४५ कोटींचा लक्ष्यांक अाहे. या जिल्ह्यात अातापर्यंत अवघे ६५ कोटी म्हणजे ३.७३ टक्केच पीककर्ज वाटप झाले अाहे. एक लाख ७४ हजार ५६१ खातेदार शेतकऱ्यांपैकी सहा हजार ७३८ शेतकऱ्यांना ६५ कोटी १० लाख रुपये वाटप झाले अाहेत. जिल्ह्यातील एकूण पीककर्ज वाटपाच्या १७४५ कोटींच्या लक्ष्यांकापैकी सर्वाधिक १२२४ कोटी रुपये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना उद्दीष्ट देण्यात अालेले अाहे. परंतु या बँकांनी अाजवर अवघे ३८ कोटी ८६ लाख रुपयेच वाटप केले.

वाशीममध्ये १०६ कोटीचे पीककर्ज
वाशीम जिल्ह्यात खरिपासाठी १४७५ कोटीं रुपये वाटपाचे नियोजन करण्यात अाले. अातापर्यंत या जिल्ह्यात १०६ कोटी रुपये वाटप झाले. यात सर्वाधिक वाटप हे अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १०७४२ सभासदांना ९४ कोटी ७६ लाख रुपये केले. उर्वरित इतर बँकांनी मिळून १२ कोटी २५ लाख रुपये २१८० सभासदांना दिले. या जिल्हयात अातापर्यंत १७ टक्के पीककर्ज वाटप झाले.

अकोल्यात १५७ कोटी पीककर्ज वाटप
अकोला जिल्ह्यात खरिपात १३३४ कोटी रुपये वाटप करण्याचे उद्दीष्ट बँकांना देण्यात अाले. यात जिल्हा मध्यवर्ती बँक ६८३ कोटी, राष्ट्रीयकृत बँकांना ५२७, खासगी बँका ४७ अाणि ग्रामीण बँकेला ७५कोटी रुपयांचे उद्दीष्ट अाहे. जिल्ह्यात अातापर्यंत १५७ कोटींचे म्हणजेच उद्दीष्टाच्या केवळ १२ टक्के पीककर्ज वितरीत झाले. यात जिल्हा बँकेंचा सर्वाधिक १२२ कोटी रुपयांचा वाटा अाहे. उर्वरित इतर बँकांनी मिळून केवळ ३५ कोटी रुपये वाटप केले.

जिल्हानिहाय पीककर्जाची स्थिती
जिल्हा लक्ष्यांक (कोटी) वाटप (कोटी) टक्के
अकोला १३३४ १५७ १२
बुलडाणा १७४५ ६५.१० ३.७३
वाशीम १४७५ १०६ १७

Web Title: crop loan for farmers in Akola