video : थंडीतही मतदानासाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

अकोला जिल्हा परिषदेच्या 53 जागांसाठी मतदानाला उत्साहात सुरूवात झाली आहे. ऐन थंडीतही ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली. जिल्हा परिषदेच्या 53 जागांसाठी एकूण 270 उमेदवार रिंगणात आहेत. यासोबतच सात पंचायत समित्यांच्या 106 जागांसाठी 499 उमेदवार रिंगणात आहे. 

अकोला : अकोला जिल्हा परिषदेच्या 53 जागांसाठी मतदानाला उत्साहात सुरूवात झाली आहे. ऐन थंडीतही ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली. जिल्हा परिषदेच्या 53 जागांसाठी एकूण 270 उमेदवार रिंगणात आहेत. यासोबतच सात पंचायत समित्यांच्या 106 जागांसाठी 499 उमेदवार रिंगणात आहे. 

विशेषतः गेल्या 20 वर्षांपासून प्रकाश आंबेडकरांचं जिल्हा परिषदेवर वर्चस्व आहे. त्यांचा पक्ष यावेळी जुन्या भारिप-बहूजन महासंघाच्या नावावरच निवडणुक लढवतोय. निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी सहा तालुक्यात आघाडीकरून लढत आहे तर मूर्तिजापूर तालुक्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची महाविकास आघाडी आंबेडकरांच्या वंचित (भारिप) व भाजपला टक्कर देत आहे. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री आणि अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी आज सकाळीच मतदान केलं. पळसोबढे या आपल्या मुळगावी धोत्रेंनी मतदानाचा हक्क बजावला. धोत्रेंनी पळसोबढेतील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान केलं. केंद्रात मंत्री झालेल्या संजय धोत्रेंसाठी अकोला जिल्हा परिषद आणि सातही पंचायत समित्या जिंकण्याचं मोठं आव्हान आहे. धोत्रेंनी जिल्हा परिषदेवर विजयाचा दावा केला आहे.

Image may contain: 12 people, people smiling, people standing

हेही वाचा - सोन्याचा भाव पाहूच नका, परवडणारं नाही ते!

  • उमेदवार ः पक्ष
  • 26 भारिप-बहूजन महासंघ (वंचित) 
  • 11  भाजप
  • 08  शिवसेना  
  • 04 काँग्रेस
  • 01 राष्ट्रवादी
  • 02 अपक्ष 
  • 53 एकूण 

उद्या निकाल
अकोला जिल्हा परिषदेच्या 53 जागांसाठी मतदानाला उत्साहात सुरूवात झाली आहे. ऐन थंडीतही ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली. जिल्हा परिषदेच्या 53 जागांसाठी एकूण 270 उमेदवार रिंगणात आहेत. यासोबतच सात पंचायत समित्यांच्या 106 जागांसाठी 499 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणूकीचा निकाल उद्या (ता.8) सकाळपासून जाहीर करण्यात येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds for voting even in the cold in akola