‘सीआरआरआय’ची सिमेंट रस्त्यांच्या दर्जावर नजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

नागपूर - शहरातील सिमेंट रस्त्यांच्या दर्जावर शहरातील सामाजिक संस्थांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यानंतर महापालिकेने जिओटेक कंपनीची नियुक्ती केली. परंतु, जनमंच या संस्थेने जिओटेककडून निष्पक्ष चौकशीची अपेक्षा फोल असल्याचे नमूद करीत त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशीची मागणी केली. अखेर स्थायी समितीने सिमेंट रस्त्यांच्या कामांचे मूल्यांकन आदीसाठी सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या नियुक्तीसाठी मंजुरी दिली. 

शहरातील सिमेंट रस्त्यांची पाहणी केल्यानंतर जनमंच या संस्थेने महापालिकेकडे सिमेंट रस्त्यांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याची मागणी केली होती. मात्र, महापालिकेने जिओटेकद्वारेच तपासणी केली जाईल, असा हट्ट धरला तर जनमंचने जिओटेक ही महापालिकेची सल्लागार कंपनी असून, या कंपनीकडून निष्पक्ष तपासणी होऊ शकत नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे महापालिका व जनमंच यांच्यात वादाचीही ठिणगी पडली होती. 

यातून महापालिका सिमेंट रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी पुढे का येत नाही? या सवालासह सिमेंट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत महापालिकाच आरोपीच्या पिंजऱ्यात होती. सामाजिक संस्थांचा दबाव लक्षात घेता शहर अभियंत्यांनी सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटला सिमेंट रस्त्यांच्या ऑडिटबाबत प्रस्ताव पाठवला. परंतु, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटने ऑडिटबाबत असमर्थता दर्शविली. परंतु, प्रयोगशाळेतून आलेल्या चाचणीचा आढावा घेणे, प्रत्यक्ष कामाच्या वेळी तांत्रिक बाबीसाठी तज्ज्ञांचा सल्ला, कामाची गुणवत्ता वाढविण्यासाठी बांधकाम साहित्याबाबत मार्गदर्शन, कामाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, बांधकामात त्रुटी आढळल्यास उपाययोजना सुचविणे आदी मार्गदर्शन करण्याची तयारी असल्याचे सांगितले. यासाठी आवश्‍यक खर्चास स्थायी समितीने आज झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. त्यामुळे आता जिओटेकच्या अहवालाचीही तपासणी सीआरआरआय करण्याची शक्‍यता आहे. 

‘टप्पा दोनमधील सिमेंट रस्ते ५० टक्के पूर्ण’ 
सिमेंट रस्ता टप्पा दोनमधील ५० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी केला. काही ठिकाणची कामे २ ते ३ महिन्यांत पूर्ण होतील, असे ते म्हणाले.

Web Title: CRRI watch on Cement Road Quality