कारखाली चिरडून दोन वर्षांची चिमुकली ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

नागपूर ः घरासमोरून जात असलेल्या कारखाली दोन वर्षांची चिमुकली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिला वाचविण्यासाठी रस्त्यावर उडी घेणारी आई गंभीर जखमी झाली. हा अपघात मंगळवारी सकाळी हुडकेश्‍वरमध्ये घडला. संघवी स्वप्निल वानखेडे (वय 2, रा. अलंकारनगर, पाठक ले-आउट) असे अपघातात ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल वानखेडे हे वाहनचालक आहेत. त्यांच्याकडे तवेरा कार आहे. भाड्याने कार देणे तसेच अन्य वाहनांवर चालक म्हणून काम स्वप्निल करतात. त्यांनी नुकतेच घर बदलले होते. त्यांनी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घरासमोर कार उभी केली. दरम्यान, त्यांची दोनवर्षीय मुलगी रस्त्यावर कारसमोरच खेळत होती. घाईघाईत आलेल्या स्वप्निलने कार सुरू केली. थोडे अंतर पार करताच रस्त्यावर खेळत असलेली संघवी कारखाली चिरडल्या गेली. मुलगी चाकाखाली आल्याचे लक्षात येताच आईने मुलीला वाचविण्यासाठी कारसमोर उडी घेतली. त्यामुळे तीसुद्धा जखमी झाली. तिच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, संघवी ही कारच्या चाकाखाली चिरडल्याने मृत्यू पावली. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crush under the car and Killed two years