ट्रॉमात लवकरच सीटी स्कॅन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ड्रीम प्रोजेक्‍ट ट्रॉमा केअर युनिट सेवेत दाखल झाले. सुरुवातीला ३० खाटांची क्षमता असलेले हे युनिट सुरू झाले. आता सात कोटी रुपयांचे सीटी स्कॅन आणि दीड कोटी रुपये किमतीचे डिजिटल एक्‍सरे सुरू  होणार आहे. 

ही दोन्ही उपकरणे ट्रॉमात दाखल झाली असून त्याच्या ‘कॅलिब्रेशन’ची प्रक्रिया  अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या तीन आठवड्यांत ही दोन्ही उपकरणे रुग्णसेवेत दाखल होतील. त्यामुळे अपघाती रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यास मदत होईल.

तीन माळ्यांच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये दीड कोटी रुपयांचे अद्ययावत डिजिटल रेडिओलॉजी उपकरणही कार्यान्वित होणार आहे. तीस खाटांचे तीन अतिदक्षता वॉर्ड तयार झाले. परंतु, प्रत्येकवर्षी ३० खाटांचा ट्रॉमा सुरू करण्यात येणार आहे. ट्रॉमात खाटांची संख्या ३७ वर येऊन थांबली आहे.

येणाऱ्या काळात यात आणखी २३ खाटांची भर पडणार आहे. अपघाती रुग्णांना थेट दाखल करून घेण्यावर भर दिला जाणार आहे. नव्याने दाखल झालेल्या सिटीस्कॅन आणि डिजिटल एक्‍सरेमुळे अपघाती रुग्णांचा मेडिकल, सुपरकडे फेरा वाचणार आहे. अपघाती रुग्ण आल्यानंतर त्याला ट्रॉमातच सगळ्या सोयी मिळणार आहेत.

ट्रॉमात सध्या ३० खाटांचे युनिट सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात मायनर ओटी आणि  कॅथलॅबही सुरू झाली आहे. तब्बल साडेचार कोटी रुपये खर्चून कॅथलॅब सुरू झाले. अपघातात रक्तवाहिन्यांना क्षती झालेल्या रुग्णांची सोय झाली आहे. ट्रॉमा युनिटमध्ये सध्या १३ मोबाईल व्हेंटिलेटर कार्यरत आहेत. हे व्हेंटिलेटर कुठेही हलवता येते. १० व्हेंटिलेटरची भर पडणार आहे. 

-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल

Web Title: ct scan machine in trama care unit