पावणेदोन कोटींच्या नोटा जप्त; सहा अटकेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नागपूर - पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद झाल्यामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. त्यामुळे अनेकांनी काळ्या पैशाची विल्हेवाट लावणे सुरू केले आहे. अशातच नागपुरातील हिलटॉपमधील एका रिकाम्या फ्लॅटवर अंबाझरी डीबी पोलिस पथकाने छापा घालून कोट्यवधींच्या नोटा असलेली बॅग हस्तगत केली. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली.

सध्या शहरात रात्रीच्या काळोखात काळ्या पैशांची विल्हेवाट लावण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसही सतर्क आहेत. अंबाझरी पोलिसांना हिलटॉप परिसरातील एका फ्लॅटमध्ये सहाजण पैशाने भरलेल्या बॅगसह असल्याची माहिती मिळाली. रात्री नऊ वाजताच्या सुमारास पोलिसांनी या फ्लॅटवर छापा घातला. यात सहाजण जवळपास १ कोटी ८७ लाखांच्या नोटांच्या बॅगसह आढळून आले. या सहाही जणांना पोलिसांनी अटक केली असून, हा पैसा कुणाचा आहे? कशासाठी आणला? आदी चर्चेला उधाण आले आहे. मात्र, पोलिसांनी या कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगल्याने आरोपींची नावे कळू शकली नाही. या प्रकरणी पोलिस उद्या खुलासा करण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, हिलटॉप परिसरात उद्योजक, राजकीय क्षेत्रातील मातब्बर मंडळी वास्तव्यास असल्याने विविध चर्चेलाही ऊत आला आहे.

Web Title: currency seized