पतीपत्नीचा करंट लागून मृत्यू 

file Photo
file Photo

टाकळघाट (जि.नागपूर) ः बुटीबोरी एमआईडीसीतील गणेशपूर येथे करंट लागून पतीपत्नीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.19) सकाळी घडली. मृत पतीचे नाव सुभाष नत्थू गायकवाड(वय 45) व पत्नीचे नाव संध्या असे आहे. 
सविस्तर वृत्त असे की, गायकवाड दाम्पत्य हे बऱ्याच दिवसांपासून गणेशपूर येथे स्वतःच्या मालकीच्या घरात राहत होते. सुभाष हा बुटीबोरी एमआईडीसीतील जॉनसन लिप या कंपनीत काम करीत होता. संध्या हीसुद्धा एका कंपनीत कामावर जायची. रविवारी सकाळी सुभाष अंघोळ करून आल्यानंतर त्यांना अंगणात कपडे वाळविण्यासाठी बांधलेल्या तारेचा अचानक हाताचा स्पर्श झाला. त्यांना जोरदार जिवंत विजेचा धक्का बसला व ते तारेला चिकटल्याचे दिसताच त्यांची पत्नी संध्या त्यांना ओढायला गेली. दरम्यान तीसुद्धा सुभाषला चिटकली. तारेचा स्पर्श सुटताच नंतर दोघेही दूरवर फेकल्या गेली. दोघेही बेशुद्धावस्थेत असताना परिसरात आरडाओरड होताच लोकांची गर्दी जमली. लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी ताबडतोड बुटीबोरी येथील रुग्णालयात दोघांना उपचारसाठी नेले. तेथे डॉक्‍टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता नागपूरला पाठविले असून पुढील तपास भास्कर मेटकर करीत आहेत. 
चिमुकल्यांचे छत्र हरपले 
मृत सुभाष व संध्या यांना दोन चिमुकल्या मुली आहेत. एक पाचवीत तर दुसरी तिसऱ्या वर्गात शिकत आहे. घटनेच्या दिवशी या दोन्ही मुली घरीच होत्या. आईवडिलांना करंट लागल्याचे समजताच त्या रडत आईबाबांना हात लावण्याचा प्रयत्न करू लागल्या. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना पकडून ठेवले. आईबाबांची प्रकृती बिघडली असे सांगून त्यांना शांत करण्याचा शेजाऱ्यांनी प्रयत्न केला. डॉक्‍टरांनी दोघांनाही मृत घोषित केल्याने या दोन्ही चिमुकल्या ढसाढसा रडू लागल्या. मृत सुभाषची आई व भाऊ बालाघाट येथे राहतात. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com