करंट लागून दोन महिलांचा मृत्यू

ज्योत्स्ना भाजीपाले,आशा भाजीपाले
ज्योत्स्ना भाजीपाले,आशा भाजीपाले

बेला (जि. नागपूर) ः धुतलेले कपडे तारावर टाकताना करंट लागल्यामुळे एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बेला येथील बाजार परिसरात मंगळवारी घडली. त्यामुळे येथे शोककळा पसरली आहे.
मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ज्योत्स्ना विजय भाजीपाले (वय 35) ही महिला धुतलेले कपडे तारावर टाकायला गेली. परंतु या तारेला "अर्थिंग' तारेतून विजेचा प्रवाह आला होता. त्यामुळे ज्योत्स्ना तारेला चिकटली. तिला वाचवण्याकरिता तिची जाऊ आशा दिलीप भाजीपाले (वय 45) ही धावून गेली. परंतु तीसुद्धा तारेला चिपकली. दोन्ही महिलांना बेशुद्धावस्थेत प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डॉक्‍टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दोन्ही महिला संयुक्तपणे गुण्यागोविंदाने एकाच घरी राहत होत्या. ज्योत्स्नाला एक मुलगा व एक सात वर्षाची मुलगी आहे. ती आईविना पोरकी झाली आहे. या घटनेची बेला पोलिस ठाण्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रवाना केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com