सायबर पोलिसांमुळे वाचली त्यांची जीवनाची कमाई

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती : सायबर गुन्हे वाढत असले तरी, तक्रारकर्त्याच्या माहितीवरून सायबर पोलिसांनी वेळीच दखल घेतल्यामुळे संबंधिताच्या खात्यातून बेपत्ता झालेली रक्कम परतसुद्धा मिळत आहे.


शहरातील गोपालनगर येथील कोमलसिंग आडे यांना ऍक्‍सिस बॅंकेमधून बोलत असल्याचे सांगून एकाने संपर्क साधला. क्रेडिट कार्ड ऍक्‍टिव्ह करावयाचे असून, त्यासाठी क्रेडिट कार्डाची माहिती सांगायला लावली. श्री. आडे यांनी बॅंकेतूनच बोलत असल्याचा विश्‍वास ठेवून तोतयास गोपनीय माहिती दिली. एवढेच नव्हे तर, आडे यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपीसुद्धा त्यांनी तोतया बॅंक अधिकाऱ्याकडे शेअर केला. त्यामुळे त्यांच्या बॅंक खात्यामधून 42 हजार 420 रुपये एवढी रक्कम दोन वेळा, तर तिसऱ्यांदा वीस हजार रुपये असे एकूण 1 लाख 4 हजार 820 रुपये एकूण रक्कम आडे यांच्या बॅंक खात्यातून विविध व्हॉलेटवर वळतीसुद्धा झाली. व्यवहार केले नसताना खात्यामधून पैसे बेपत्ता होत असल्याचे कळताच काही तासाच्या आत त्यांनी आयुक्तालयातील सायबर ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. अधिकाऱ्यांनी तत्काळ विविध कंपनीच्या नोडल अधिकाऱ्यांना मेल पाठवून चर्चा केली. ज्या व्हॉलेटवर रक्कम पाठविली, परंतु संबंधिताने काढली नसल्याने 84 हजारांची रक्कम बचावली.

आनंद झाल्याने आभारही मानले
एकाच दिवशी अचानक एक लाख रुपये खात्यातून तोतयाने उडविल्यामुळे कोमलसिंग आडे आर्थिक अडचणीत सापडले होते. परंतु रक्कम परत मिळाल्याने त्यांना आनंद झाला. त्यांनी पोलिस उपायुक्त प्रशांत होळकर, सहायक पोलिस आयुक्त लक्ष्मण भोगन, पोलिस निरीक्षक प्रवीण काळे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र सहारे यांचे आभारही मानले.

कॅशबॅक मिळाले, केवायसी करायची आहे, यासाठी फेक लिंक पाठविणे, ऍप डाऊनलोड करायला लावून खातेदारांची फसवणूक करणे, असले प्रकार सुरू आहेत. अशा पद्धतीने संपर्क करणाऱ्यांच्या फोनला प्रतिसाद देऊ नये. बॅंकेशी संपर्क साधावा.
प्रवीण काळे, पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com