सायकल खरेदीच्या दरावरून संभ्रम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

नागपूर - जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या सायकल खरेदीचा चौकशी फसलेला चाक अखेर सहा महिन्यानंतर बाहेर निघाला. पण, आता जुन्या आणि नवीन सायकल खरेदीच्या दरावरून संभ्रम निर्माण झाला आहे. 

नागपूर - जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या सायकल खरेदीचा चौकशी फसलेला चाक अखेर सहा महिन्यानंतर बाहेर निघाला. पण, आता जुन्या आणि नवीन सायकल खरेदीच्या दरावरून संभ्रम निर्माण झाला आहे. 

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत ८० लाख रुपयांच्या निधीतून विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येणार आहे. खरेदी प्रक्रियेवरून वाद निर्माण झाल्याने ही प्रक्रिया लांबणीवर गेली होती. सहा महिन्यांनंतर सायकल खरेदीची चौकशी पूर्ण झाली. त्यानंतर नुकतेच सीईओंनी सायकल वाटपाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. आधीच्या खरेदीत प्रतिसायकलचे दर ५ हजार ४०० रुपये होते. त्याची निविदादेखील ५ डिसेंबरच्या जीआरपूर्वी झाली होती. पण,  आता शिक्षण विभाग व समाजकल्याण विभागातर्फे जवळपास १ कोटी रुपयांच्या निधीतून विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप केले जाणार आहे. मात्र, आता लाभार्थ्यांना थेट सायकलचे वाटप न करता नवीन नियमानुसार थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. त्यासाठी

शासनाने प्रतिसायकलचा दर ४ हजार १०० रुपये निश्‍चित केला आहे. या दरानुसार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. मात्र, आधीच्या सायकल खरेदीचा दर ५ हजार ४०० व आता शासनाने निर्धारित केलेल्या सायकलचा दर ४ हजार १०० रुपये जाहीर केला आहे.  त्यामुळे सायकलच्या दरात जवळपास १३०० रुपयांचा फरक असल्याने काही सदस्य आणि लाभार्थ्यांमध्ये यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. आधीच्या सायकल खरेदीचे दर एवढे अधिक कसे असा सवालदेखील काही सदस्यांनी उपस्थित केला आहे. सीईओंनी सायकल वाटपाचे आदेश दिले असले तरी अद्याप प्रत्यक्षात सायकल वाटपाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सायकलपासून विद्यार्थी लांबच असल्याचे चित्र आहे.

Web Title: cycle purchase rates