अट्टल सिलिंडर चोर पोलिसांच्या ताब्यात

file photo
file photo

टाकळघाट (जि.नागपूर ) ः जनतेच्या घरातील स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अखेर एमआयडीसी बुटिबोरी पोलिसांनी अटक केली. आशीष बबन जीवतोडे (वय 30, झरी मंगरूळ, ता. चिमूर, ह. मु. सातगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. वृत्त असे की, बुटीबोरी एमआयडीसी पोलिस हद्दीतील सुकळी गावातील घर फोडून त्या घरातील सिलिंडर व मोबाईल चोरी केल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंदविलेली आहे. चोरीतील मोबाईल हा सायबर सेलने "ट्रेस' केला असता मोबाईल आरोपीचे नातेवाईक शेगाव (बु.), ता.भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथे वापरत असल्याचे दिसून आले. त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी मोबाईल शेगाव येथून जप्त करून विचारपूस केली असता आरोपी हा रिधोरा सातगाव येथे राहत असल्याचे कळताच सहायक पोलिस निरीक्षक सुनील लांघी यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे इकबाल शेख, प्रफुलल राठोड, पोलिस हवालदार भास्कर मेटकर, पोलिस शिपाई अमोल कोटेवार, रमेश नागरे यांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन पोलिस ठाणे एमआयडीसी हद्दीतून चार सिलिंडर व एक मोबाईल तर पोलिस ठाणे बुटीबोरी हद्दीतून तीन सिलिंडर चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी चोरी केलेले सात सिलिंडर, एक मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 61 हजार 600 रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com