दादासाहेबांचे स्मारक ज्ञानकेंद्र व्हावे - मुख्यमंत्री

अमरावती - रा. सु. उपाख्य दादासाहेब गवई स्मारक संकुलाच्या पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला.
अमरावती - रा. सु. उपाख्य दादासाहेब गवई स्मारक संकुलाच्या पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला.

अमरावती - 'दादासाहेब गवई हे ज्ञानी होते आणि त्यांना सर्वसामान्य माणसाच्या व्यथा-वेदनांची जाणीव होती. ज्ञान आणि जाणिवा यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला होता. त्यांचे स्मारक ज्ञानकेंद्र म्हणून ओळखले जावे,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात आज रा. सु. उर्फ दादासाहेब गवई स्मारक संकुलाचा पायाभरणी समारंभ पार पडला. यावेळी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉ. सुनील देशमुख, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, डॉ. राजेंद्र गवई आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, दादासाहेब गवई यांनी आमदार, खासदार, सभापती, राज्यपाल म्हणून काम केले. ते ज्या पदावर गेले, त्या पदाचा सन्मान वाढविण्याचे कार्य त्यांनी केले. दादासाहेब गवई हे राजकारणापलीकडील व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सर्वांसोबत कौटुंबीक स्नेह जपला. विचारांची देवाण-घेवाण, सौहार्दतेमुळे एका उंचीचा सभापती राज्याला लाभला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com