डागातील ‘एमसीएच विंग’ रखडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

नागपूर - प्रसूतीदरम्यान माता आणि नवजात शिशूंचे मृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने देशभरात १०० खाटांच्या क्षमतेचे मॅटर्नल ॲन्ड चाइल्ड हेल्थ विंग (एमसीएच विंग) उभारण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याची घोषणा केली होती.

त्यानुसार डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात हे विंग उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. एमसीएच विंगसाठी डागातील जुनी इमारत पाडली. तीन महिने लोटूनही मनपाने अद्याप परवानगी न दिल्याने इमारतीच्या नवीन बांधकामात अडसर येत आहे. 

देशभरात ६० पेक्षा अधिक स्त्री रुग्णालये किंवा जिल्हा रुग्णालयांतील संलग्न ‘लेबर रूम’ वॉर्डाचे विस्तारीकरण करून हा प्रकल्प सुरू केला जाणार होता. त्यानुसार डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात तीन मजल्यांची इमारत कार्यान्वित केली जाणार होती. यात सुरक्षित बाळंतपणासाठी अद्ययावत शल्यचिकित्सेची सुविधा असलेले तीन लेबर रूम, त्याच्याशी निगडित प्रसूती व नवजात शिशूसांठी वॉर्ड कार्यान्वित केले जाणार होते. रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या निवासी डॉक्‍टरांसाठी रुग्णालय परिसरातच निवासी गाळे उभारले जाणार होते. जेणेकरून तातडीच्या वेळी गर्भवती मातेला सेवा देणे सोयीचे होईल. 

चार महिन्यांपूर्वी इमारत बांधकामाला तत्त्वत: मंजुरी दिली. त्यानंतर ज्या जागेत ही एमसीएच विंग प्रस्तावित होती त्या ठिकाणी असलेली जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली. 

मात्र, पुढील टप्प्यात महापालिकेच्या संबंधित विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र, सातबारावर नाव चढविणे अशी सरकारी प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, चार महिन्यांपासून महापालिकेकडून ही प्रमाणपत्रे अडवून धरली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

प्रसूती वॉर्ड खाटांची क्षमता - ३०
पीएनसी वॉर्ड खाटांची क्षमता - १०

५० लाखांचा निधी मंजूर
डागा स्मृती रुग्णालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तीन वर्षांपूर्वी तसा प्रस्तावही सादर केला. या विस्तारीकरणाच्या कामासाठी केंद्र सरकारने टोकन अमाउंट म्हणून ५० लाखांचा निधी राज्य सरकारकडे वळता केला. डागा रुग्णालयात दररोज पन्नासपेक्षा अधिक शिशूंचा जन्म होतो. राज्यात जन्मदरात दुसऱ्या क्रमांकावर हे रुग्णालय आहे. यामुळेच एमसीएच विंगला डागात मान्यता देण्यात आली.

Web Title: daga hospital MCH wing