गांधी घराण्यांवर डागली तोफ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

यवतमाळ : देशातील गरीब घरातील महिलांना शौच्छालय नसल्याने त्यांना रात्रीच्या अंधाराचा आधार घ्यावा लागत होता. ज्यांची सत्तर वर्षे देशात सत्ता असताना जे महिलांच्या सन्मानासाठी साधे शौच्छालय बांधू शकले नाहीत, ते देश आणि राज्य काय चालविणार, अशा शब्दात केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. 

स्थानिक पोस्टल मैदानावर शनिवारी (ता. 19) युतीचे उमेदवार मदन येरावार यांच्या प्रचार सभेत इराणी बोलत होत्या. यावेळी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, प्रवीण पांडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना इराणी यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. ज्या पक्षाचे नेतृत्व दिशाहीन आहे ते राज्याला दिशा काय देणार, असेही त्या म्हणाल्या. कॉंग्रेस पक्ष हा केवळ एका परिवारापुरता आहे. त्यांचा देशहिताशी कुठलाही संबंध नाही. जावयासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायचा, एवढेच त्यांना माहिती आहे. ज्यांनी कधी गरीबी अनुभवली नाही, त्यांना गरिबांचे प्रश्‍न काय समजणार. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून महिलांना गॅस कनेक्‍शन दिले. आरोग्याच्या सुविधा दिल्या, असेही इराणी म्हणाल्या. 

मराठीतून संवाद
ेकेंद्रीयमंत्री स्मृती इराणी आल्यानंतर सूत्रसंचालकांनी हिंदीतून संवाद साधण्यास सुरवात केली. त्यावेळी इराणी यांनी मराठीतून बोला. मला सर्व समजते, असे सांगितले. त्यानंतर सभेला संबोधित करताना इराणी यांनी मराठी आणि हिंदीतून संवाद साधला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dagli guns on Gandhi family