‘सिंचन’ची दैनंदिन सुनावणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नागपूर - बहुचर्चित विदर्भातील सिंचन घोटाळ्याशी संबंधित खटले तीन महिन्यांत निकाली काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शैलेश देशपांडे यांनी गोसेखुर्द उजवा कालवा गैरव्यवहार खटल्यावर दैनंदिन सुनावणी सुरू केली आहे. 

सिंचन घोटाळ्याशी संबंधित या प्रकरणात नऊ आरोपींविरुद्ध चार दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. आरोपींमध्ये गुरुदास मांडवकर, संजय खोलापूरकर, सोपान सूर्यवंशी, चंदन जिभकाटे, उमाशंकर पर्वते, रोहिदास लांडगे, दिलीप पोहेकर, देवेंद्र शिर्के (सर्व व्हीआयडीसी अधिकारी) व मुंबई येथील हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे विकास अधिकारी सुनील शिंदे यांचा समावेश आहे. 

कोट्यवधींचे नुकसान
गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे मातीकाम व बांधकामाचे कंत्राट  हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन कंपनीला देण्यात आले होते. दरम्यान, नियमबाह्य पद्धतीने कामाचे मूल्य वाढविण्यात आले. तसेच, अन्य विविध गैरप्रकार करून सरकारचे कोट्यवधींचे नुकसान करण्यात आले असे सरकार पक्षाचे म्हणणे आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. वसंत नरसापूरकर कामकाज पाहात आहेत.

Web Title: daily hearing of irrigation started